NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ५ मार्च, २०१४

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे

टक्केवारीसाठी नारळे फोडणार्‍या नेत्याने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे -नागेश पाटील आष्टीकर

हदगाव(वार्ताहर)हदगाव / हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासुन वादळी वार्‍यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शेतकर्‍याच्या शेतातील हरभरा, गहू या पिकासह इतर काही रब्बी पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्ग चिंचेत पडला आहे. निसर्गासमोर हातबल झालेल्या शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा विश्वानाने नवडणुन दिलेले आमदार महाशय माञ टक्केवारीसाठी नारळे फोडुन आगामी होणार्‍या निवडणुकीची तयारी करण्यात मग्न असल्याचे चिञ सध्या पाहावयास मिळत असुन शेतकर्‍याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणार्‍या नेत्यांला स्वत बसु देणार नाही. तसेच शेतकर्‍यांना त्वरीत रब्बी पिकांचे नुकसान न मिळाल्यास शिवसैना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नाही असे मत शिवसैना तालुका प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी पञकार परिषेदेमध्ये बोलतांना व्यक्त केले.

पुढे बोलतांना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की, हदगाव / हिमायतनगर तालुक्यात या वर्षी अतीवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकर्‍यांनी शेतातमध्ये पेरलेले खरीब पिके ही पुर्णता वाया गेली परंतु शेतकर्‍यांनी हिंमत न सोडता जोमाने रब्बी पिके घेण्यासाठी शेतीची मशागत करुन व्याज दिडीने केर्ज काढून हरभरा ,गहू या रब्बी पिकांची पेरणी मोठयाप्रमाणात केली. परंतु मागील काही दिवसापासुन वातावर्णात बदल झाल्याने हदगंाव हिमायतनगर तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपीट व आवकाळी पाऊस झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली ही रब्बी पिकांचे 100 टक्के नुकसान झाले यामुळे शेतकर्‍यांच्या डोळयात पाणी आले असुन शेतकर्‍यांच्या जिव्हाच्या प्रश्‍नाकडे आमदार महाशय साप दुर्लक्ष करीत असुन विश्वासाने निवडणुन दिलेल्या आमदार महाशय माञ शेतकर्‍याचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा ठिकठिकाणी नारळे फोडुन आपली टक्के वारी घट करीत आगामी निवडणुकीची तयारी करीत असल्याचे चिञ सध्या पाहावयास मिळत आहे.

हदगाव / हिमायतनगर तालुक्यातील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुूळे आतोनात नुकसान झाले असतांना ही आमदार महाशयांनी माञ चालु असलेल्या अधिवेशनात तोेंड उघडले नाही. आमदार महाशयांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी हदगंाव हिमायतनगर तालुक्यातील भोळया भाबडया जनतेनी निवडुन दिले आहे यांचा विसर त्यांनी पडु देवु नये असे त्यांनी बोतलांना सांगितले. तसेच सतत पडत असलेल्या पावसामुळे हरभरा व गहू ही पिके पुर्ण हाताशी गेले असुन या सर्व नुकसान ग्रस्त शेताचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दयावी या साठी शिवसैनेच्या वतीने हदगंाव तहसिलदार , तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले असुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकर्‍यांच्या हितासाठी शिवसैना रस्त्यावर उतरणार असल्यासे त्यांनी पञकार परिषदेमध्ये बोलतांना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा