NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, ४ मार्च, २०१४

भाजपात महाभारत

नांदेड मध्ये भाजपात महाभारत

नांदेड(रमेश पांडे)लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रमजाहीर करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरु केलेली असतानाच नांदेडमध्ये मात्र भारतीय जनता पक्षात निवडणुकीपूर्वीच ‘महाभारत’सुरु झाले आहे. पक्षाचे महानगर अध्यक्ष डॉ.धनाजीराव देसमुख यांनी जाहीर केलेली कार्यकारिणी बोगस असल्याचे पत्रक नगरसेविका सौ.गुरप्रीतकौर सोडी यांनी काढल्यामुळे भाजपातील अंतर्गत कलह दिवसेंदिवस उमेदवार डी.बी.पाटील यांना राजकीय भवितव्यासाठी ‘मारक’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नांदेड लोकसभेसाठी डी.बी.पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच पक्षातील सक्रीय नेते ‘अंग झटकून’ कामाला लागल्याचे चित्र आहे. डी.बीं.च्या गळ्यात उमेदवारीची माळ पडताच पक्षातील निष्ठावंत गटात ‘मातम’ पसरल्याचे दिसून येते. मोदी मिशनसाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना नांदेडमध्ये मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील अंतर्गत रणधुमाळी सुरु झाली. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु होऊन गटबाजीला उत आला आहे. पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.धनाजीराव देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केलेल्या कार्यकारिणीला आक्षेप घेत पत्रकबाजी सुरु झाल्यामुळे कार्यकर्त्यांचे विशेषतः भाजपाच्या पारंपारिक मतदारांचे खच्चीकरण हहोणार आहे. डॉ. देशमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कार्यकारिणी जाहीर केली आहे. देशमुख यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानेच त्यांनी हा ‘उद्योग’ केला आहे. ज्यांनी भाजपात प्रवेशही केला नाही, अशा इतर पक्षातील कार्यकर्त्यांची नांवे कार्यकारिणीत आहेत, ही कार्यकारिणी निवडण्यामागे मोठे गुढ असावे अशी शंका नगरसेविका सौ. गुरप्रीतकौर दिलीपसिंघ सोडी यांनी व्यक्त केली आहे. हा माझा अधिकारच - डॉ. देशमुख आपण जाहीर केलेली कार्यकारिणी पक्षाने दिलेल्या अधिकारातूनच केली असून ती पूर्णपणे वैध आहे. त्या आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्हाध्यक्ष आपण असल्यामुळे कार्यकारिणीत कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हे आपणच ठरवणार आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. धनाजीराव देशमुख यांनी दिली.

दरम्यान मंगळवारी कार्यकारिणी जाहीर करण्यावरून घडलेल्या घडामोडीवर पडदा टाकण्यासाठी भाजपाची निवडणूक संचलन समिती स्थापन केल्याचे पत्रक व्यंकटेश साठे यांनी काढले. विशेष म्हणजे या समितीची बैठकही झाली आणि यात रामपाटील रातोळीकर, डॉ.धनाजीराव देशमुख, सुधाकर भोयर, चैतन्य देशमुख, शोभा वाघमारे, आरती पुरंदरे, धनश्री देव, श्रावण भिलवंडे, उमाकांत गोपछडे, डॉ.अजित गोपछडे, देवीदास राठोड, प्रवीण साले, रामकेंद्रे, शितल खांडील, व्यंकटेश साठे, गंगाधर कावडे, माधव साठे आदींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले. नांदेडमध्ये भाजपची टक्कर बलाढ्य कॉंग्रेसशी होणार असल्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारावर निवडणुकीत मात करण्यासाठी डावपेच आखण्याऐवजी, मतदारांत जागृती करण्याऐवजी भाजपातच सुरु झालेले हे महाभारत उमेदवार डी.बी.पाटील यांना चांगलेच अडचणीत टाकणारे दिसत आहे. एकंदरीत डी.बी.पाटील यांच्या उमेदवारीमुळे कलह सुरु झालेल्या भारतीय जनता पक्षात अस्थिर वातावरण निर्माण झाले असून पक्षीय कार्यकर्ते सैरभैर होण्याची भीती भाजपाप्रेमी मतदारांत व्यक्त होत आहे. लोकसभेसाठी इच्छूक उमेदवार डी.बीं.च्या प्रचारासाठी उतरणार की नाही, याकडे मात्र जनतेचे लक्ष लागून आहे.
टिप्पणी पोस्ट करा