NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

सोमवार, ३ मार्च, २०१४

जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या रोजगार - स्वयंरोजगार विभागाच्या 
जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार यांची निवड


हिमायतनगर(वार्ताहर)मागील अनेक वर्षापसून काँग्रेस पक्षाचे निष्ठेने कार्य करणारे तथा विधानसभा निवडणुकीत जीवाचे रान करून आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विजयात हात भार लावणारे  व परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमेटीचे विद्यमान संचालक श्री प्रकाशराव कोमावार यांचे चिरंजीव प्रवीण कोमावार यांची पक्षातील कार्याची दखल घेवून, आधुनिक भारताच्या निर्मित्तीमध्ये ज्या राजकीय पक्षाची प्रमुख भूमिका आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या रोजगार - स्वयंरोजगार विभागाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार यांची निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिले आहे.

तसेच सदर पदावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, श्री प्रीतम आठवले प्रदेशाध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग मुंबई याच्या मार्गदर्शनाखाली काम करावे. तसेच काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरनांची प्रभावी अंमल बजावणी करून सर्व जाती धर्माच्या वंचित घटकांना सोबत घेवून पक्ष संघटन मजबूत करावे असे सुचित केले आहे. प्रवीण कोमावार यांची रोजगार - स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील, तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, जी.प.सदस्य सुभाष राठोड, सरपंच गंगाबाई शिंदे, संदीप तुप्तेवार, रफिक सेठ, ज्ञानेश्वर शिंदे, हानुसिंग ठाकूर, लक्ष्मण शन्नेवाड, पापा दंडेवाड, चंद्रकांत मुधोळकर, शे.शब्बीर भाई खडकीकर,शे.मुनीर, सुनील चव्हाण आदींसह अनेकांनी अभिनदन केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा खडकी बा.चे सरपंच पांडुरंग गाडगे, सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, प्रकाश जैन, फ्रेस फोरमचे सचिव शे.इस्माईल, ज्ञानेश्वर गोडसेलवार आदींनी शाल श्रीफळ व पुष्पहार देवून अभिनंदन करून भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.   
टिप्पणी पोस्ट करा