NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २८ मार्च, २०१४

काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार

ताईंच्या आदेशाशिवाय घड्याळाचा गजर नाही....
काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार.. हिदायत खां पठाण

तामसा(देविदास स्वामी/अशोक गायकवाड)राष्ट्रवादीच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील यांचे आदेश येई पर्यंत हिंगोली लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवाराचा प्रचार करणार नाही असा स्पष्ट शब्दात नकार राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हिदायत खां पठाण यांनी दिला. ते तामसा येथे आयोजित राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत थेट उमेदवाराच्या समक्ष बोलत होते.

दि.२८ शुक्रवारी हदगाव तालुक्यातील तामसा येथील सरपंच प्रभाकर महाजन यांच्या निवासस्थानी हिंगोली लोकसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील, माजी सभापती बाळासाहेब कदम आदींसह अनेकांची उपस्थिती होती. या बैठकीत प्रचाराबाबत चर्चा सुरु असताना श्री पठाण म्हणाले कि, आ.जवळगावकर यांनी यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून त्यांना बरोबरीचा मान - सन्मान देवू असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर आघाडीचा धर्म पाळला नाही. तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतकेच आहेत असे वक्तव्य करून एक प्रकारे अवहेलना केली होती. मित्र पक्ष असलेल्या बुद्धिवान नेत्यांकडून मिळालेली वागणूक हि स्वतःचे अकलेचे तारे तोडणारी आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधीकार्यात व कार्यकर्त्यात नाराजीचा सूर आहे. आम्हीही मानेस आहोत, आम्हाला सुद्धा मान - सन्मान आहे. त्यामुळे आम्ही होऊ घातलेल्या हिंगोली लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचा प्रचार करणार नाही जोपर्यंत आमच्या नेत्या सूर्यकांताताई आम्हाला आदेशित करणार नाहीत तोपर्यंत आम्ही व आमचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किशनराव पवूळ माजी जी.प.सदस्य शंकरराव गायकवाड, माजी सरपंच खंडेराव आगलावे, प्रभाकर महाजन, श्रीकांत मेहेत्रे, मुबीन खान पठाण, बालाजी जाधव, दत्ताराम माने, बापूराव घरके, संतोष पवार, आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडणुकीतील उमेदवारांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.

काँग्रेसला करावी लागणार कसरत

लोकसभा उमेदवाराची खर्या अर्थाने सध्या प्रचाराला सध्या तरी सुरुवात झाली नसली तरी, हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्यसाठी काँग्रेसच्या उमेदवाराची दमछाक होत असल्याचे चित्र यावरून तरी दिसून येत आहे. अश्या संधीचा फायदा घेण्यात शिवसेनेच्या उमेदवारच हातखंड असल्यामुळे काँग्रेसपक्षाला मोदीच्या वादळात हि निवडणूक जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा