NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, ९ मार्च, २०१४

शिवजन्मोत्सव

जय भवानी जय शिवाजीच्या गजरात शिवजन्मोत्सव साजरा

हिमायतनगर(अनिल मादसवार)हिन्दवी स्वराज्य संस्थापक तथा बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून जिजाऊ, शिवाजी महाराज यांच्या झाकीची भव्य अशी शोभा यात्रा य भवानी जय शिवाजीच्या गजरात हाती भगवे झंडे घेवून काढण्यात आली होती. यावेळी शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी ०९ मार्च रोजी येथील युवकांच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने प्रथम शहरातील परमेश्वर मंदिर पासून छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शोभा यात्रा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व नारळ फोडून काढण्यात आली. मिरवणुकीच्या समोर चार भारुडी भजनी मंडळ त्यामागे चीमुल्यांची रांग यांनी भगवे झंडे हाती धरले होते. त्यामागे घोड्यावर विराजमान माता जीजावू, शिवाजी महाराज, बाल शिवाजी अशी प्रतीकात्मक झाकी तयार करण्यात आली. या देखाव्याची मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. चीमुकल्या बालकांनी यात हुबेहूब वेशभूषा परिधान करून उपस्थिती दर्शविली होती. मिरवणुकीच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी पेंडॉल उभे करून, मठ्ठा, सरबत, सुद्ध पेयजलाची व्यवस्था नागरिकांनी केली होती. मिरवणूक रस्त्यावर शहरातील महिलांनी रांगोळी काढून स्वागताची जय्यत तयारी केली होती. सदर मिरवणुकीत युवकांनी तलवार बाजीचे प्रात्यक्षिक दाखवून जय भवानी जी शिवाजी, हिंदू धर्माचा विजय असो..असे नारे दिल्याने परिसर दणाणून निघाला होता. मागील अनेक वर्षाच्या जयंती पेक्षा या वर्षीच्या शिवजयंती शहरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरली.

सदर मिरवणूक हि परत येथील श्री परमेश्वर मंदिरात येवून समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन माने, उपाध्यक्ष राम सूर्यवंशी, सचिव गोविंद शिंदे, यांच्यासह गजानन हरडपकर, गजानन चायल, कुणाल राठोड, देविदास शिंदे, अंबादास अलकटवार, बालाजी ढोणे, अजय बेदरकर, सुधाकर चीठेवार, शिव होळकर, मुजाहिद खान, अकबर कुरेशी, गजानन हेंद्रे, विपुल दंडेवाड, संदीप तुम्बलवाड, सचिन नरवाडे, योगेश चिलकावार, प्रसाद डांगे, विशाल नरहरे यांच्यासह अनेक शिवप्रेमी युवकांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा