NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, १ मार्च, २०१४

अंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.

अंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो..डोळस प्रशासनाचा आंधळा कारभार

हिमायतनगर(अनिल मादसवार)एकंबा येथील एका अंध शेतकर्यास शेतीच्या वहिवाट रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अपंगत्वावर मात करून स्वावलंबी आयुष्य जगत असताना डोळसांकडून दोन्ही डोळे अंध असलेल्या व्यक्तीस समाजात कशी वागणूक मिळते याचे हे उदाहरण होय.

तालुक्यातील मौजे एकंबा येथील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या दत्त रामजी दरेवाड हा शेतकरी आपल्या अपंगत्वावर मात करून नातेवाईकांच्या मदतीने शेती करून स्वाभिमानी आयुष्य जगात आहे. परंतु सदरील शेतकर्यास शेतीत ये - जा करण्यासाठी मोकळ्या रस्त्यासाठी आवश्यकता आहे. सर्व्हे नं.तीस (३०) मधून एकंबा ते कौठा (ज.) हा गाडी रस्ता तहसील कार्यालय हदगाव यांनी दि.२५ जून १९९२ साली मोजणी करून कायम स्वरूपी दिला होता. परंतु जळ- फळाट करून घेणाऱ्या काही शेजारील शेतकर्याने सदरील गाडी रस्त्यावर अतिक्रमण करून बंद केला आहे. त्यामुळे अंध शेतकर्यास शेतात जाण्या -येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असून, परिणामी या वर्षीच्या शेतीचा हंगाम पाडीत झाला आहे. हि बाब गावात कार्यरत असलेल्या तंटा मुक्त समितीच्या कानी टाकून प्रश्न सोडविण्याची मागणी केली, परंतु त्यांना हि समस्या सोडविण्यात अपयश आले आहे.

त्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी वारंवार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालयाकडे अर्ज, विनंत्या निवेदने सादर केली. परंतु डोळस प्रशासाच्या आंधळ्या कारभारामुळे एका अंध शेतकऱ्याला उंबरवठे झिजवूनही न्याय मिळाला नाही. प्रशासनाकडून कायम उपेक्षाच पदरी पडल्याच्या भावना त्याने नांदेड न्युज लाइव्ह समोर बोलून दाखवीत उडवा - उडवीची उत्तरे देवून हाकलून देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. येत्या दहा दिवसात सदरील वहिवाट रस्ता खुला करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा हिमायतनगरच्या तहसील कार्यालय समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी हदगाव, तहसीलदार, पोलिस स्टेशन हिमायतनगर यांना दिल्या आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा