NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, २३ मार्च, २०१४

सागवान तस्करांचे " जंगल में मंगल "

वनविभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे " जंगल में मंगल "   हिमायतनगर(अनिल मादसवार)अंतरराष्टीय(जागतिक)वनदिनानिमित वृक्ष लागवड करून झाडे लावा - झाडे जगवाचा संदेश वनक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जिल्हाभरात दिला जात आहे. परंतु हिमायतनगर येथील प्रभारी वन अधिकार्यांनी केवळ चार माणसाना सोबत घेवून छायचित्र काढून वनदिन साजरा केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांच्या या प्रकारामुळे ज्या भागात वनदिन साजरा झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला, चक्क त्याच वनविभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने सागवान तस्करांचे " जंगल में मंगल " होत असल्याने वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे सर्वत्र जागतिक तापमान वाढत असल्याचे संकट उभे असताना, दुसरीकडे मात्र लाकूड तस्करामुळे जंगल भुई सपाट होण्याच्या मार्गावर आहे. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.ठाकूरवार यांच्या काळात हिमायतनगर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड करून, वृक्ष जोपासना करीत वृक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यामुळे गत दोन वर्षात हिमायतनगर तालुक्यातून सागवान, गहरी, धावंडा, बारतोंडी, खैर, मोहफुल या झाडांच्या कत्तलीवर विशेष नियंत्रण ठेवून वनपरिक्षेत्र वाढविण्यावर भर दिला होता. तसेच उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या सोयीसाठी पाणवठे तयार करून तहान भाग्विलीहोती. यामुळे ऐन उन्हाळ्यात सुद्धा जंगल परिसर हिरवागार दिसत असल्याने मानवी वस्तीकडे येणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी झाली होती. या भागाची नागपूर येथील अप्पर प्रधान वनसंरक्षक श्री सर्वेशकुमार व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) औरंगाबाद येथील श्री मेई पोक्कीम अय्यर, नांदेड वनविभागाचे जिल्हा उपवनसंरक्षक जी.पी.गरड, सहाय्यक वनसंरक्षक(तेंदू) नांदेड येथील बी.एस.घवले यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाने पाहणी करून हिमायतनगर तालुक्यातील वनपरीक्षेत्राला भेट देऊन वनविभागाचे मुक्त कंठाने कौतुक केले होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर या वनपरीक्षेत्राची वाताहत झाली आहे. परिणामी दरेसरसम, दुधड, पवना, वाशी, एकघरी, टाकराळा, दरेगाव, दाबदरी, वाई, आदी वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात आहे. हि बाब संबंधित विभागाला माहित असताना वनसंरक्ष करणारे अधिकारी कर्मचारी नांदेड, भोकर सारख्या शहराच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. त्यामुळे परिसरातील सागवान तस्कराने जाळे पसरविले आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवरील जंगल भकास होत असून, आत्ता तर वाळवांटासारखी परिस्थिती दिसून येत आहे. येथील तीन वनपाल, १० वनरक्षक कार्यरत असताना, संबंधितांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जंगलात सर्रास वृक्ष तोड होत असल्याचे दिसून येत आहे.     

याबाबत प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री केंद्रे यांच्याशी संपर्क साधून वरील प्रकाराबाबत विचारणा केली असता, बैंका फोडल्या जातात, ए.टी.एम.फोडल्या जातात, माणसे असताना घरे फोडली जात आहेत. हे तर जंगल आहे, वृक्ष तोड होणे हे साहजिकच आहे, असे बेजबाबदार वक्तव्य करून एक प्रकारे सागवान तस्करीला मूक संमती असल्याचे निदर्शनास आणून दिले.  
टिप्पणी पोस्ट करा