NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, २२ मार्च, २०१४

ग्राहकानो सावधान..

ग्राहकानो सावधान..
निनावी कॉल येताच गायब होतेय एटीएम खात्यातील रक्कम

हिमायतनगर(अनिल मादसवार)तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे, चालू करावयाचे असले तर एटीएम. कार्डचा सिरियल नंबर व पासवर्ड सांगा..असा निनावी फोन अनेकांना येत आहेत. त्यावरून माहिती दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब होत आहे. त्यामुळे एटीएम.धारकांनी सावधान राहून आपल्या खात्यावरील रक्कम सुरक्षित ठेवावी असे सांगण्याची वेळ बैन्केच्या शाखाधीकारयांवर आली आहे. असाच काहींसा प्रकार हिमायतनगर शहरातील ग्राहकासोबत घडल्याने एकच खळबळ उडाली असून, सदर ग्राहकाने या बाबत हिमायतनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सध्या बैन्केतील खात्यात रक्कम असलेल्या ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर निनावी फोनद्वारे कोल येत आहे. कोल रिसीव्ह करताच हैलो मै... एटीएम कंपनी से बोल रहा हूं... क्या आप एटीएम का उपयोग करते हैं.. असा प्रश्न निनावी कोलद्वारे केला जातो. तुम्ही हां म्हणाले कि, लगेच पुढचा प्रश्न कौनसे बैंक का.. तुम्ही बैन्केचे नाव सांगताच, तो म्हणतो कि तुम्हारा एटीएम कार्ड ब्लॉक कर दिया गय हैं... का..? असा प्रश्न विचारताच कंपनी कि और से एटीएम कार्ड व्हेरिफिकेशन किया जा रहा हैं... आप हमेशा एटीएम का उपयोग नही करते हो.. अगर उसे शुरू राखना हैं तो... एटीएम कार्ड के १६ से १९ नंबर के आकडे बताओ... असे सांगून नंबर घेवून, लागलीच कार्ड ऐक्तीवेट करण्यासाठी पासवर्ड(पिन नंबर) मागितला जातो... अन्यथा तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होईल असे संगितले जाते. त्यामुळे सहजरीत्या ग्राहक आपल्या सोयीचा कोल समजून माहिती देतात. यावरून कोणत्याही बैन्केचे एटीएम असेल तरी त्या बैन्केतून बोलतो असे सांगून ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड होऊ लागले आहे. ज्या एटीएम धारकांना निनावी फोन आला त्यांनी जर कार्ड क्रमांक व पासवर्ड सांगितला कि काही वेळातच तुमच्या खात्यावरील रक्कम गायब झालेली दिसून येत आहे.

असाच कांहीसा प्रकार हिमायतनगर येथील शे.फय्याज शे.इब्राहीम रा. यांच्या सोबत घडला आहे. त्यांच्या भारतीय स्टेट बैन्केतील खात्यातून ४ हजाराची रक्कम दि.१४ मार्च रोजी गायब झाली आहे. हि बाब दि.२१ रोजी येथील बैंक शाखेत रक्कम काढण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात आली. त्यांनी शाखाधिकारी जैन यांना विचारणा केली असता सदरची रक्कम तामिळनाडू येथील बँक शाखेच्या एटीएम मधून एकच दिवशी दि.१४ मार्च रोजी प्रथम १०००, दुसर्यांदा १५०० व तिसर्यांदा १५०० अश्या पद्धतीने तीन वेळा रक्कम काढण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे सदर ग्राहकास धक्का बसला व आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

रक्कम गेल्याचे कळताच सदर ग्राहकाने अन्य नंबरवरून संपर्क केला असता तो कॉल उचलला गेला नाही. पुन्हा काही वेळाने संपर्क केला असता एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगण्यात आले. तुमचे नाव काय असे म्हणताच बैंक ऑफ इंडिया मुंबई शाखेच्या एटीएम कॉल सर्विस मधून बोलतो असे सांगण्यात आले. पुन्हा संपर्काचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकाने सांगितले.

याबाबत येथील बैन्केचे शाखाधिकारी किशोरचंद जैन म्हणाले कि, अश्या पद्धतीचा फोन आल्यास ग्राहकांनी आपली कोणतीही माहिती सांगू नये. या बाबत माहिती असल्यास थेट बैन्केशी संपर्क साधून शंकेचे निरसन करून घ्यावे असणे आवाहनही त्यांनी केले.

सदर तक्रारी बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, हा प्रकार बाहेरील आहे, तसेच बैन्केच्या अंडरमधील आहे. त्यामुळे आम्ही यात काही करू शकत नाही, तरी सुद्धा सदरचा नंबर कुठला आहे. हे शोधून काढून देवू शकतो असे त्यांनी सांगतले.
टिप्पणी पोस्ट करा