NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ६ मार्च, २०१४

निवडणूक आयोगाच्या आदेशाने

निवडणूक आयोगाच्या आदेशाने
मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आमदार - खासदारांना बसणार चाप

नांदेड(अनिल मादसवार)लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी ०५ (पाच मार्च) पासून लागू करण्यात आली. त्यापूर्वी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आमदार व खासदारांनि विकास निधीच्या अनेक कामांच्या वर्क ऑर्डर पदरात पाडून घेवून उद्घाटनाचा सपाटा लावला होता. परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशाने आता वर्क ऑर्डर हाती असूनही त्याचा काही उपयोग होणार नाही. आयोगाच्या सूचनेमुळे लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतील कामे आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विकास कामे करण्याचे लोकप्रतिनिधींचे मनसुबे उधळले जाणार असून, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आमदार - खासदारांना निवडणूक आयोगाच्या आदेशाने चाप बसणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तसा विधानसभेच्या निवडणुकीला अजून आठ ते नऊ महिन्याच्या कालावधी बाकी आहे. परंतु आत्तापासूनच हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा तास विधानसभेच्या सदस्यांचा फारस संबंद येत नाही, तरी देखील एकाच महिन्यामध्ये कोट्यावधीचा विकास निधी वाटप करून निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी एकाच वर्तमान पत्रात जाहिरात बाजी करून निधी वाटपाचा राजकीय स्टटबाजी केली असल्याची चर्चा सुरु आहे. लोकप्रतिनिधी म्हणताच विकासाची कामे -कमी अधिक प्रमाणात करावी लागतात. हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी कोत्यावाधीचा निधी खेचून आणला. परंतु मागील चार वर्षाच्या काळात सदरचा निधी रोकून धरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर निधी वाटपाचा सपाटा लावला असून, एकाच दिवसात आठ ते दहा ठिकाणी नारळ विकास कामाचा गवगवा करण्याच्या प्रयत्न केला अशी चर्चा जनतेच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

मागील १५ वर्षाच्या काळात विद्यमान खासदार तथा तत्कालीन आ.सुभाष वानखेडे यांनी विकास कामे केली नाहीत असे म्हणता येणार नाही. त्यांच्या काळातही बहुतांश कामे झाली, परंतु एवढा गवगवा त्यांनी कधीच केला नाही. जनतेप्रती सेवेची भावना ठेवून अनेक विकासाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. हि सत्यता कोणालाही नाकारता येत नाही.

जनतेनी भरभरून मतांनी निवडून आणल्याची जान ठेवून आ.जवळगावकर यांनी विकास निधी अगदी खेचून आणला हे सत्यही कोणी नाकारू शकत नाही. परंतु मागील चार वर्षात जेवढी कामे झाली नाहीत. तेवढ्या मोठ्या कामांचे मागील महिन्याभरात करण्यात आलेली जाहिरातबाजी व उद्घाटने हि आगामी काळातील निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

अश्या कामांना आळा बसावा म्हणून खासदार, आमदार यांच्या विकास निधीबाबतच्या सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव, योजना अंमलबजावणी विभागाचे सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांना नुकत्याच दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या भागातील लोकसभा, राज्यसभेचे सदस्य यांचा निधी वितरित करू नये. त्याचबरोबर निवडमूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषदेचे आमदार यांचा विकास निधी नव्याने वितरित करू नये, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या आदेशामुळे हदगाव - हिमायतनगर तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेल्या व करू पाहणाऱ्या कामांचे काय..? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

याबाबत उद्घाटन करण्यात आलेल्या हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक २ मधील काही नागरिकांशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटने करून कामाला सुरुवात केली नाही, त्यामुळे हा प्रकार एक प्रकारे जनतेची दिशाभूल करणारा होय असे अनेकांनी बोलून दाखविले.
टिप्पणी पोस्ट करा