NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, २ मार्च, २०१४

डी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट'

डी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट'

​नांदेड(रमेश पांडे)‘आयत्या पिठावर रांगोळी’ या न्यायाने सध्या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची काम करण्याची नवी प्रक्रिया सुरु आहे. राजकारणात शिस्तबद्ध, तत्वनिष्ठ आणि पक्ष घटनेच्या चौकटीत काम करणारा पक्ष म्हमून भारतीय जनता पक्षाची ख्याती आहे. परंतु नांदेडमध्ये लोकसभेची उमेदवारी बहाल करताना ही सर्व मुल्य पायदळी तुडविले गेले. सारासार विचार न करता पक्षश्रेष्ठीने घेतलेला हा निर्णय म्हणजे कॉंग्रेसला एक प्रकारची ‘गिफ्ट’ दिल्याचे मानले जात आहे.

देशभरात उसळलेल्या मोदी मिशनच्या लाटेत भाजपा नांदेड लोकसभेची जागा अलगद गिळंकृंत करणार असे वाटत होते. भाजपाला ही जागा सहजासहजी मिळता कामा नये यासाठी कॉंग्रेसनेही व्यूव्हरचना आखून आपल्या राजकीय डावपेचात विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर यांना डच्चू देत नवा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली. यावेळी खतगावकरांचे काहीही चालणार नाही, हे कॉंग्रेसच्या सर्व्हेक्षणात सिद्ध झाले होते. दुसर्‍या बाजुने भारतीय जनता पक्षानेही गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हाभरात सर्व्हेक्षण केले. त्यात कोणत्याही एका इच्छूक उमेदवाराच्या बाजुने कौल मिळाला नसला तरी बाहेरचा उमेदवार नकोच,या मुद्यावर मात्र एकमत झाले होते.

चर्चेत असलेल्या इच्छूकांमध्ये राम पाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख यांच्यासह 6-7 जणांची नांवे होती. आमच्यापैकीच एकाला उमेदवारी द्यावी, असे या इच्छूकांनी वारंवार सांगूनही पक्षश्रेष्ठींनी उमेदवार निवडीत केलेला ‘खेळखंडोबा’ निष्ठावंतांची नाराजी ओढवून घेणारा ठरणार आहे.गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटनकार्य अतिशय संथगतीने सुरु असताना मोदी ङ्गॅक्टरच्या ‘सलाईन’मुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत काम करण्याचे बळ मिळाले. संघ परिवारासह भाजपा विचारसरणीच्या मतदारांतही उत्साह दिसून येत होता. इच्छूक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना कामालाही लावले होते. उमेदवारी मिळो अथवा न मिळो परंतु भाजपला मिळालेली संधी मात्र गमावली जाणार नाही, असा ठाम निर्धार करून मतदारांमध्ये जनजागृती करणार्‍या कार्यकर्ते व खुद्द मतदारांच्या पदरी मात्र पक्षश्रेष्ठींच्या या विचित्र निर्णयामुळे निराशाच आली. भाजपातून राष्ट्रवादीत आणि पुन्हा भाजपात आलेल्या डी.बी.पाटील यांना उमेदवारी देण्याचा तडकाङ्गडकी निर्णय पक्षाच्या अंगलट येणारा ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी येत्या एक-दोन दिवसांत मुंबईला धडकणार असून तेथे समाधान न झाल्यास थेट दिल्लीवारी करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत निर्णय बदलण्यास पक्षश्रेष्ठीला भाग पाडू अन्यथा निवडणूक कामावर बहिष्कार टाकला जाईल, अशी काही संतप्त कार्यकर्त्यांनी जळळीत प्रतिक्रिया दिली आहे. एकंदरीत काही दिवसांपासून अतंय्त उत्साहाचे वातावरण निर्माण झालेल्या भाजपात गेल्या दोन दिवसांपासून सन्नाटा पसरल्याची स्थिती आहे.​ 
टिप्पणी पोस्ट करा