NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १२ मार्च, २०१४

चौकशी करण्यास टाळाटाळ

नदीकाठावरील शेतकरी अनुदानापासून वंचित...
चौकशीचे आदेश देवूनही मंडळ अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यास टाळाटाळ

हिमायतनगर(वार्ताहर)अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना अनुदानापासून वंचित ठेवणारे तलाठी सुगावे यांची चौकशी करून निलंबित करा अशी मागणी येथील शेतकर्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे केला होती. या प्रकरणाची चौकशी करून शेतकर्यांना वंचित ठेवणाऱ्या तलाठ्याचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी मंडळ अधिकार्यास दिल्या होत्या. यास दोन महिन्याचा कालावधी लोटूनही आजपर्यंत मंडळ अधिकारी श्री सय्यद इस्माईल यांनी जायमोक्यावर जावून चौकशी न करता तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. संकटग्रस्त शेतकर्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तलाठ्यास अभय देऊ पाहणाऱ्या मंडळ अधिकार्यासही निलंबित करावे अशी मागणी वंचित शेतकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केली.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात मुसळधार पाउस झाल्याने पैनगंगा नदीला तीन वेळा पूर आला होता. या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये शिरल्याने शेतजमिनीसह पिके पूर्णतः खरडून गेलि होती. शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबतचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने सातत्याने प्रकाशित करताच दखल घेत मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांच्यासह तालुक्यातील डझनभर नेते व अधिकाऱ्यांनि बुडीत क्षेत्राची पाहणी करून नुक्संग्रस्ताना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येथील तलाठी श्री सुगावे यांना नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान क्षेत्राचे पंचनामे केले. परंतु सदर तलाठी महाशयांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण -घेवाण करत मर्जीतील शेतकऱ्यांची नावे पंचनामयात सामाविस्थ केली. त्यामुळे पळसपूर नदीकाठावरील प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले होते. हि बाब लावण्यात आलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीवरून समोर आली.

पूरग्रस्त नुकसानीच्या पंचनाम्यात खुद्द राज्यमंत्री सुरेश धस यांनी पाहणी केलेल्या जमीन क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही. या क्षेत्रातील शेतकरी विठ्ठल गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. यास कारणीभूत सलेल्या लालची तलाठी श्री सुगावे यांनी केलेल्या सर्व्हेच्या कामाची चौकशी करून शेतकर्यांना वंचित ठेवल्याप्रकरणी निलंबित करावे अशी मागणी केली होती. या मागणीची दाखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हिमायतनगरचे तालुका दंडाधिकारी यांनी मंडळ अधिकारी श्री सय्यद यांना जा.क्रं.२०१४/अतिवृष्टी/ सीआर, दि.३१ जानेवारी २०१४ ला संबंधित शेतकर्यांना वंचित ठेवणाऱ्या तलाठ्याच्या कार्याची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा अश्या सूचना दिल्या होत्या. यास दोन महिन्याचा कालावधी लोटला असताना मंडळ अधिकार्यांनी अद्याप पर्यंत नदीकाठावर जावून तक्रारीची कोणतीही चौकशी केली नाही. उलट शेतकर्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या सुगावे नामक तलाठ्यास अभय देवून परस्पर अहवाल पाठविला कि काय..? अशी शंका शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोषी अधिकार्यास पाठीशी घालणाऱ्या सदर मंडळ अधिकार्यास वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्या प्रकरणी कार्यवाही करून वंचित शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा