NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, १ मार्च, २०१४

बेदम मारहाण.. युवक कोमात

प्रवाशी भरण्याच्या कारणावरून युवकास बेदम मारहाण.. युवक कोमात ... 


हिमायतनगर(वार्ताहर)ऑटोमध्ये प्रवाशी भरून नेताना झालेल्या वादावादीचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत आदिवासी युवक ऑटो चालकास दोघांनी बेदम मारहाण केल्याने तरुण युवक कोमात गेल्याची घटना दि.२८ शुक्रवारच्या रात्री घडली. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्थानकात जीवे मारण्याचा प्रयत्न, अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी युवक अजूनही बेशुद्ध असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,शहरातील उमर चौक या ठिकाणी ग्रामीण भागातील प्रवाशांच्या ये - जा करण्यासठी खाजगी ऑटो पोईंट आहे. येथून पार्डी, वाशी, दगडवाडी, सवना ज. एकघरी सह टेंभी, अन्देगाव, पावना आदी ठिकाणच्या गावी जाणारे ऑटो थाबा आहे. नित्याप्रमाणे नंबरला लावून एकघरि येथील ऑटो चालक दीपक डुकरे वय ३० वर्ष चार चाकी वाहनात प्रवाशी भरत होता. या वरून सय्यद सुलतान याने येवून तू ऑटोमध्ये बर्हाली तांड्याचे प्रवाशी का भरतोस म्हणून ऑटोची चावी काढून घेतली. याची विचारणा केली असता, त्याने मारहाण करून त्याचा भावू व परिसरात असलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणून अश्लील शिवीगाळ, करून तीन ते पाच जणांच्या टोळक्यांनी संगनमत करून आडवे पाडून छातीत लाथा बुक्क्याने व रोडने जबर मारहाण करून ऑटोचालक युवकास गंभीर जखमी केले. या मारहाणीत सदर युवक गंभीर रित्या जखमी होवून कोमात गेल्याने, युवकाची परिस्थिती गंभीर झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी सदर युकाच्या पोटाचे ऑपरेशन झालेले असल्याने या घटनेमुळे सदर युवक भेदरला आहे. या अवस्थेत त्याने हिमायतनगर पोलिस स्थानकात तक्रार दिली. परंतु सायंकाळी ६ पर्यंत पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्यामुळे शेकडो आदिवासी युकानी संबंधित गुंडांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी मध्यरात्री पर्यंत पोलिस स्थानकाबाहेर ठिय्या मांडला होता. अखेर मध्यरात्री पोलिसांनी फिर्यादी दीपक परमेश्वर डुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी स.निसार आणि स.सुलतान या दोघांवर कलम २९४,३२३, ५०६,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात येउन त्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस जमादार आडे हे करीत आहेत.  

परंतु पोलिसांनी केवळ दोघांवर गुन्हे दाखल केले त्यातही गंभीर गुन्हे दाखल केले नाहीत, त्यामुळे दुसर्या दिवशी शेकडो युकानी शिवीगाळ प्रकरणी ऐट्रोसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लावून धरली आहे. तर आणखीन काही जन मोकाट असल्यामुळे या घटनेबाबत पोलिस दुटप्पी भूमिका बजावत असल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. 

हिमायतनगर शहरात पोलिसांच्या स्वार्थी वृत्तीमुळे शहरात अवैध्य वाहतूक बोकाळली असून, प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शिस्त राहिली नाही. रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त स्वरूपात गाड्या उभ्या करून राहाद्दरीला अडथळा निर्माण केला जात आहे.त्यामुळे पादचारी व शाळकरी मुलीना व दर्शनसाठी जाणर्या महिला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे नूतन पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. 
टिप्पणी पोस्ट करा