NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

जन्मठेप

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)भोळ्या स्वभावाची पत्नी आहे म्हणून लग्नानंतर दोन वर्षातच तिचा खून करणाऱ्या नवऱ्यास येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश एस.बी.म्हस्के यांनी जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

डोंगरगाव ता.किनवट येथील परमेश्वर नारायण डाके (25) याचे लग्न पेंदा ता.किनवट येथील उषाबाई उर्फ लक्ष्मीबाई हिच्यासोबत सन 2009 मध्ये झाले होते. लग्नानंतर तिचा नवरा परमेश्वर आणि नणंदा संगीता नारायण डाके (27) व सौ.अनिता उर्फ कृष्णा किशन भुरके (22) या तिघांनी तिला नेहमी छळले. तु भोळ्या स्वभावाची आहेस, तुला चांगले बोलता येत नाही, तू मला पसंद नाहीस असे म्हणून तिला हिणवत असत व मारहाण करत असत. 2010 मध्ये ती आखाडीच्या सणासाठी माहेरी आली होती. तिला 2011 च्या होळीपूर्वी घेवून जाण्यासाठी सासरची मंडळी आली. त्यावेळी बाप नसलेल्या उषाबाईची आई धोंडाबाई केशव भरकाडे यांनी पेंदा येथील आपल्या नातलगाच्या समक्ष मुलीला त्रास देणार नाही या अटीवर तिला नांदावयास पाठविले. 

25 जुलै 2011 रोजी धोंडाबाईला दूरध्वनीवरुन उषाबाई मेल्याची खबर सांगण्यात आली. ती आपल्या नातलगांसह डोंगरगाव येथे आली. तेंव्हा उताण्या अवस्थेत उषाबाई बाजेवर पडलेली होती आणि तिच्या नाकातून, तोंडातून व कानातून रक्त बाहेर आले होते. यावरुन उषाबाईच्या मृत्यूबाबत धोंडाबाईला संशय आला आणि तिने उषाचा नवरा परमेश्वर डाकेसह नणंदा संगीता डाके व अनिता भुरके यांच्याविरुध्द किनवट पोलीस ठाण्यात तक्रार दिली की तिघांनी शेल्याने (मोठ्या दस्तीने) गळा आवळून उषाबाईचा खून केला आहे. त्यावरुन किनवट पोलिसांनी तिघांविरुध्द भादंविच्या कलम 302,498, 34 नुसार गुन्हा दाखल केला आणि तिघांना 1 ऑगस्ट 2011 अटक केली.

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दोन्ही महिलांना जामीन मिळाला होता. परमेश्वर डाके अटकेपासून तुरुंगातच होता. न्यायालयात उषाबाईचा मृत्यू प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याआधारे न्यायाधीश म्हस्के यांनी परमेश्वर डाकेला आपली पत्नी उषाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंड ठोठावला. या प्रकरणातील महिलांची सुटका करण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू ऍड.सौ.अल्का कुर्तडीकर यांनी मांडली. तर आरोपीच्या वतीने ऍड.आर.जी.परळकर यांनी काम पाहिले.
टिप्पणी पोस्ट करा