NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

परमात्मा आपल्यातच आहे

परमात्मा आपल्यातच आहे... त्यासाठी सत्कर्म करा..फुलाजी बाबा

हिमायतनगर(अनिल मादसवार)देव कोणत्याही दगडात नाही..देव आंधळ्या खुळ्या माणसात व आपल्यातच आहे..आपला आत्मा म्हणजेच परमेश्वर परमात्मा आहे. त्यांना ओळखण्यासाठी सत्कर्म करा असे भावोद्गार प.पु.श्री.श्री.श्री.परमहंस फुलाजी बाबा यांनी सांगितले. ते हिमायतनगर येथिल फुलराय नगरीत आयोजित एक दिवसीय सत्संग कार्यक्रमात उपस्थित भक्तांना संबोधित करताना बोलत होते.

शहरातील बोरगडी रोडवर असलेल्या फुलराय नगरीतील सिद्धेश्वर संस्थान ध्यान केंद्राच्या मैदानात कार्यक्रम स्थळी संत फुलाजी बाबांचे आगमन होताच उपस्थित हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, मागील ३० वर्षापूर्वी मी जंगलात जावून तपश्चर्या केली, त्या ठकाणी मला परमात्माची भेट झाली. त्यांच्या आद्नेनुसार मी सध्या सर्वत्र सत्संगाचे धडे देवून जनकल्याणासाठी प्रयत्न करीत आहे. पाप - पुण्या करणे हे माणसाच्याच हाती आहे. त्यासठी सर्वांनी आपल्यातील परमात्म्याच्या ग्रंथाचा बोध घेवून सत्कर्म करून, दुसर्याच्या सुखात आपले समाधान मानल्यास चांगले फळ मिळते. भारत हा एक देश आहे, येथे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हम सारे ही भाई भाई...आहोत. परन्तु आपणच आपल्यात जमीन, संपत्तीसाठी भांडत आहोत. मृत्यू नंतर मनुष्याला स्मशानभूमीतच जावे लागते. त्यासठी सर्वांनी आपल्यात होत असलेले भांडण दूर करून एकसंघाने राहुन, संसारी जीवनात अध्यात्माच्या मार्गाने चालावे. तरच मनुष्य जीवन सफल होवून मुक्ती मिळते असे वाहनही त्यांनी केले. यावेळी राम राठोड, सत्यव्रत्त ढोले, डॉ. मनोहर राठोड, अहिरवाड सर, चंद्रभान टारापे, राउत सर, राम नरवाडे, विलास वानखेडे, अनिल राठोड, जाधव साहेब, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार धम्मपाल मुनेश्वर आदींसह अनेक मान्यवर ब हजारो महिला - पुरुष भाविक भक्त उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा