NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

अवकाळी पावसाने पिकांची वाट लावली

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून पिकांची वाट लावली

नांदेड(प्रतिनिधी)जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हैदोस घातला असून, रब्बी हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. जिल्ह्यात कालपासून जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सरासरी 19.16 मि.मी.पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात व शहरात वादळी वाऱ्यासह, गारपिटीसह जोरदार पाऊस सुरु आहे. काल सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगाम पूर्णतः हातातून गेल्याचे चिन्ह दिसत आहे. शेतावर उभा असलेला गहू आडवा झाला तर तूर, हरभरा या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. उन्हाळी ज्वारी पूर्णतः शेतावर आडवी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सुसाट वेगातील वाऱ्याने पपई, केळी या बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. तर जागोजागी झाडे, विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विज पुरवठाही खंडीत झाला आहे. ग्रामीण भागातील कच्च्या घरावर असलेले पत्रे उडून गेली असून, शहरातही या पावसाने हैदोस घातला आहे. काल रात्री तब्बल तीन तास जोरदार पाऊस झाल्याने आज सकाळी सखल भागातील नाल्या, ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे घाणीचे पाणी रस्त्यावर साचले. पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली असून ती पुढीलप्रमाणे आहे. नांदेड-15.88, मुदखेड-26, अर्धापूर-24.66, भोकर-28, उमरी-22.33, उमरी-22.33, लोहा-15.17, कंधार-17, किनवट-22.72, हदगाव-29.40, मुखेड-15.14, धर्माबाद-20, हिमायतनगर-17, बिलोली-23.20, देगलूर-4.33 असा एकूण 306.64 मि.मी. व सरासरी 19.16 अशी नोंद झाली आहे
टिप्पणी पोस्ट करा