NEWS FLASH लोकसभा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकास यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश, मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यासाठी गुरुवारी पनवेल सावंतवाडी दरम्यान काँग्रेस पक्ष करणार सत्याग्रह आंदोलन, मुखेड नगरपरिषदेच्या घन - कचरा व्यवस्थापन टेंडर निविदा प्रक्रिया रखडल्याने जागोजाग घाण साचली, राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा- सचिन सावंत **

३० सप्टेंबर, २०१३

साथरोग पंधरवडा

हिवताप निर्मुलनासाठी किटकजन्य साथरोग पंधरवडा - जिल्हा आरोग्य अधिकारी


नांदेड(अनिल मादसवार)जिल्ह्यात डासांमुळे आजार होऊ नये व त्याचा प्रतिबंध कसा करावा यासाठी 14 ऑक्टोबर पर्यंत किटकजन्य साथरोग प्रतिबंध पंधरवडा साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी दिली. 

सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा..

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3839&cat=Mainnews

निवड

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर मुक्त पेटकर


नांदेड(प्रतिनिधी)नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता पेटकर यांची नियुक्ती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.सामाजिक कार्यातील यांची कामगिरी लक्षात घेऊन निवड करण्यात आल्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रदीप खांडापुरकर यांनी सांगितले.

२९ सप्टेंबर, २०१३

आयोजन

नवसाला पावणाऱ्या कालिंका देवी मंदिरात शनिवारपासून नवरात्रोत्सवाची धूम...विविध कार्यक्रमाचे आयोजन  


हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील जाज्वल्य माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  अश्विन शुद्ध प्रतिपदा दि.०५ आक्टोबर पासून नवरात्रोत्सवाची धूम सुरु होणार आहे. या कार्यक्रमात तमाम महिला, पुरुष भक्तांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आव्हान मंदिर कमेटीच्या वतीने नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3816&cat=Himayatnagar

संत तुकाराम महाराज म्हणतात

" परिक्रमा "

संत तुकाराम महाराज म्हणतात

" कपट काही एक / नेणे भुलवायाचे लोक //
दाऊ नेणे जुडी बुटी / चमत्कार उठा उठी //
नव्या यांच्या ऐसा / तुका निरवयासी पिसा // " http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3801&cat=Nanded

उमेदवार निश्चित अंतिम टप्यात

प्रमुख राजकीय पक्षात उमेदवार निश्चित अंतिम टप्यात 


लोहा(वार्ताहर)नगर पालिका निवडणुकीत 'प्रमुख पक्षांनी' प्रबळ उमेदवार देण्यासाठी गुप्त बैठकावर जोर दिला असून काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे तर दोन प्रभागात 'नवनिर्माण' करण्यासाठी माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेस समोर आव्हान राहणार आहे.

नगर पालिकेच्या सतरा जागेसाठी २७ ओक्टोंबर रोजी मतदान होणार असून सोळा हजार आठशे मतदार आहेत. माजी आमदार प्रतापराव पाटील व आ. शंकर अण्णा धोंडगे यांच्यात नेतृत्व वाद 'पक्षश्रेष्ठी' कडे मिटला असून प्रतापरावाकडे नेतृत्व देण्यात आले असे सांगण्यात येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी काही भागात तर काही भागात रा.कॉ व मनसे यांच्यात 'लढत' होणार अशी चर्चा आहे. प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी 'गुप्तता' पाळली आहे.

काँग्रेस कार्यालयात प्रदेश सरचिटणीस आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, जिल्हाउपाध्यक्ष कल्याण सूर्यवंशी, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग सरचिटणीस संजय भोसीकर आदी प्रभूतीच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती  सोमवारी पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आ.प्रतापराव पाटील यांनी उमेदवारांच्या निश्चितासाठी जनमताचा कौल घेतला असून प्रभागातून सर्वे करण्यात आला. सर्व ताकदीनिशी माजी मुख्यमंत्र्या सोबत  लढत द्यावी लागणार हे जाणून प्रतापराव तयारीला लागले आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रथमच माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरत आहे. काँग्रेस-राकॉ ला 'शह' देण्यासाठी सर्व तयारी 'मनसे' नी केली आहे. स्वतः वार्डातून माजी आ. चव्हाण भेटी गाठी घेत आहेत. शिवसेनेचे प्रा. मनोहर धोंडे यांनीही उमेदवार निश्चित केली आहे. प्रभाग निहाय इच्छुकांच्या व प्रभावी उमेदवारांच्या मुलाखती घेणे अंतिम टप्प्यात आले आहे. असे सांगण्यात आले. एकंदरीत नामनिर्देशन दाखल करायच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे ३ व ४ ओक्टोंबर रोजी शक्ती प्रदर्शन करून 'उमेदवारी' दाखल होईल असा अंदाज आहे.

निवड

संत रविदास गृह निर्माण संस्था अध्यक्षपदी देगलूरकर,सचिवपदी अन्नपूर्णे 

नांदेड(प्रतिनिधी)येथील संत रविदास गृह निर्माण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते चंद्रप्रकाश देगलूरकर यांची तर सचिवपदी सहकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते भगवान अन्नपूर्णे यांची बहुमताने निवड करण्यात आली. मागील बऱ्याच वर्षांपासून या संस्थेवर कब्जा कब्जा करून कांही लोकांनी मनमानी चालू केली होती. या नवीन संचालक मंडळामुळे समाजात आनंद निर्माण झाला आहे. 

सिडको नांदेड येथील गुरु रविदास मंदिरात आयोजित चर्मकार समाजाच्या व्यापक बैठकीत संत रविदास गृह निर्माण सहकारी संस्थेवर मागील अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या विद्यमान अध्यक्षाच्या व संचालक मंडळाच्या एकाधिकारशाही आणि मनमानी कारभाराबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. बैठकीस उपस्थित सर्व सभासदांच्या संमतीने यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते मा. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखालील नवीन संचालक मंडळाची बहुमताने निवड करण्यात आली. 

नवीन संचालक मंडळ :

अध्यक्ष - चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर, उपाध्यक्ष - श्याम बाबुराव निलंगेकर, सचिव - भगवान चान्दोजी अन्नपूर्णे, सहसचिव - विश्वनाथ रामराव घडलिंगे, संचालक - संभाजी देवबाजी देठवे, बालाजी किशनराव साबणे, रामराव नागोराव गंगासागरे, राजेश नागोराव पांढरे, विश्वनाथ वेंकटराव करकले, सौ. पद्मीनबाई विश्वनाथराव बनसोडे आणि सौ. जमुनाबाई ब्रह्माजी गायकवाड. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथराव बनसोडे, वेंकटराव सोनटक्के, ब्रह्माजी गायकवाड, एकनाथराव लाठकर, भगवान तारू, बाबुराव नरहिरे, राजू धडके, किशन दुधंबे, विनोद गंगासागरे,किरण बेन्द्रीकर, बाबुराव पाचकोरे, सुर्यकांत साबळे, मारोती दुधगोंडे, पंढरी हिवरे, सौ. दमयंती गोहिल, नर्मदाबाई चावडा, सौ. गोदावरीबाई वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गुरु रविदास मंदिर समितीच्या वतीने यावेळी नवीन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.  

जिल्ह्याच्या उद्योग वैभवात भर

उद्योगवाढीमुळे रोजगार मिळेल- अशोकराव चव्हाण

नांदेड(अनिल मादसवार)उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी खाजगी जमिनी मिळाल्यास आणि सध्या औद्योगिक वसाहतीतील प्लाटधारकांनी आपले उद्योग सुरु केल्यास जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल व जिल्ह्याच्या उद्योग वैभवात भर पडेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

नांदेड एमआयडीसी क्षेत्रातील अग्निशमन संकुलाच्या उद्धाटन प्रसंगी अशोकराव चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी.  सावंत हे होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. अमरनाथ राजूरकर, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक मिलींदकुमार देशमुख, एमआयडीसीचे मुख्य अभियंता पी. जे. रंगारी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योगमंत्री असतांना सन 2006 साली राज्यातील अग्निशमन केंद्रासाठी घेतलेल्या निर्णयाची फलश्रृती आता पहावयाला मिळते आहे, अशी स्मृती जागवित माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की राज्यातील 285 तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमन सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी देण्यात आला होता. अद्यापही नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात अग्निशमनदल स्थापन झाले नाहीत, अशा ठिकाणी जमीनधारकांनी जमीन उपलब्ध करुन दिल्यास अग्निशमन संकुल कार्यान्वित केले जातील.

दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत चालल्याने शहरातील सांडपाण्याचा रिसायकलींगने उद्योगधंदासाठी वापर होऊ शकतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की शिवाजीनगर उद्योग वसाहतीत उद्योग भवन सुंदररित्या बांधण्यात आले आहे. उद्योग विभागाने फर्निचरचे काम पूर्ण करुन उद्योगभवनाचे लोकार्पण करावे.अध्यक्षपदावरुन बोलतांना पालकमंत्री डी. पी. सावंत म्हणाले की, अग्निशमन दलाचे महत्व वाढत चालले आहे. सार्वजनिक इमारतीमध्ये अग्निशमन साधने उपलब्ध करुन दिली जात आहेत. आता फायर ऑडीट झाल्याशिवाय व ते पूर्ण  केल्याशिवाय सार्वजनिक इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नाही. अग्निशमन सेवा जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पुरविण्याचा प्रयत्न राहील. मारतळा येथे नियोजित वसाहतीसाठी भरपूर पैसा लागत असल्याने जिल्ह्यातील जागोजागी प्लॉटधारक उद्योजकांनी उद्योग कार्यान्वित केले पाहिजेत.  


अग्निशमन संचालक मिलींद कुमार देशमुख यांनी जीवीत व वित्त हानी रोखण्याचा संकल्प असून राज्यात 100 तालुक्यात अग्निशमन दल नाहीत तेथे उपलब्ध करुन देण्यासाठी पाऊले उचलली जातील असे सांगितले तर मुख्य अभियंता पी. जे. रंगारी यांनी राज्यात उद्योग धंदासाठी जवळपास 57 हजार हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली असे सांगितले. यावेळी आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. अमरनाथ राजूरकर, उद्योजक ए. बी. बंगाली यांनीही उद्योगवाढीस गती देण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोनशीलेचे अनावरण करुन अग्निशमन संकुलाचे उद्धाटन केले व दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमास उद्योजक,नांदेड वाघाळा शहर मनपाचे नगरसेवक तसेच विरेंद्रसिंघ गाडीवाले, श्रीराम मेंढेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रादेशिक अधिकारी संतोष पाटील यांनी केले तर संचालन सर्व्हेअर अंकुश शिरसे यांनी केले. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. ए. दराडे, उपअभियंता के. यू. गव्हाणे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

विविधवृत्त

मुंबई(प्रतिनिधी)डॉकयार्ड इमारत दुर्घटनेमधील मृतांची संख्या 61 वर गेली असून, 32 जखमीवर जे. जे. रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.

हिंगोली(प्रतिनिधी)महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक पूनम महाजन हिने स्वत: च्या सर्व्हिस रिवॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना दि.२९ रविवारी दुपारी घडली आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजले नाही.

नांदेड(प्रतिनिधी)देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान नांदेड जिल्हा असून, प्रवाश्यांच्या सोयीसाठी नांदेड - देगलूर - बिदर  रेल्वे मार्गाची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र काहींनी चुकीची माहिती दिल्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. ती मागणी पूर्ण करण्यासठी नायगाव, देगलूर येहील सर्वपक्षीयांनी पाठींबा दिला असून, या मागणीसाठी नांदेडच्या गुरुद्वार्याचे मोठे सहकार्य आहे. दि.२९ रोजी या मागणीसाठी को.दत्ता देशमुख सभाग्रह येथे बैठक संपन्न झाली. यात मागणी पूर्ण न झाल्यास वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.  

कडकडीत बंद

गणेश मंडळावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ तामसा कडकडीत बंद

 तामसा(संतोष चेपुरवार)शांततेत गणेश विसर्जन करण्यात येऊनही येथील पोलिस निरीक्षकाने समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने गणेश मंडळावर गुन्हे दाखल केले. त्या निषेधार्थ आज.दि.२९ रोजी शांततेच्या वातावरणात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

येथील गणेश मंडळाने शांततेत व सुव्यवस्थेत गणपत्ती बाप्पाला निरोप दिला असताना तामसा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकांने जाणीवपूर्वक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करून समाज भावना दुखविल्या आहेत. त्या निषेधार्त रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदमध्ये तमाम व्यापारी, दुकानदारांनी या बंदमध्ये सहभाग घेऊन १०० बंद यशस्वी केला आहे. दरम्यान खा.सुभाष वानखेडे, धनाजीराव देशमुख, राम पाटील रातोळीकर, एड.पंडितराव देशमुख यांनी भेट दिल्या.   ,

ग्रंथ

श्री शिवसमर्थ योग ग्रंथाबाबत बैठक संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचे व्यक्तीत्व, चरित्र, विचार आणि त्यांचे परस्परपुरक राष्ट्रकार्य या विषयी समग्र मार्गदर्शन करणारा ग्रंथ लवकरच प्रकाशीत होणार असून हा ग्रंथ जास्तीत जास्त वाचकांना कसा उपलब्ध होईल याच्या नियोजनाची बैठक सज्जनगडचे समर्थ भक्त रघुवीर मासिकाचे संपादक मंदार बुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. ..

भावपूर्ण श्रधांजली

डॉकयॉर्ड इमारत दुर्घटनेचा बळी ठरलेले पत्रकार योगेश पवार व कृषी व्यापारी कल्याण चवरे यांना भावपूर्ण श्रधांजली 


हिमायतनगर(वार्ताहर)मुंबई येथे शुक्रवार डॉकयार्ड रोड परिसरातील इमारतीतील दुर्घटनेत २२ कुटुंबासह दैनिक सकाळचे वार्तांकन करणारा योगेशचा पवार यांचा ढिगाऱ्यानं बळी घेतला. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या पवार यांना हिमायतनगर तालुका पत्रकार संघाच्या वतीने येथील उत्कर्ष फोटो गैलेरी कार्यालयात भावपूर्ण श्रधांजली अर्पण करण्यात आली. http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3809&cat=Himayatnagar


२८ सप्टेंबर, २०१३

सिंचन परिषद

4 व 5 जानेवारीस नांदेडात भव्य महाराष्ट्र सिंचन परिषद : अशोकराव चव्हाण

नांदेड(अनिल मादसवार)भविष्यात सिंचनासाठी पाणीवाटपावरुन प्रश्न निर्माण होऊ नयेत व त्याचे वितरण, व्यवस्थापणाचे नियोजन चांगल्या प्रकारे व्हावे, शेतकऱ्यांनी सिंचनाचे महत्व आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावा तद्वतच सिंचनासाठी कार्य केलेल्या तज्ञाचा, शेतकऱ्यांचा, संस्थांचा गौरव करावा या उद्देशाने नांदेड येथे 15 वी महाराष्ट्र सिंचन परिषद 4 व 5 जानेवारी 2014 रोजी भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या परिषदेच्या पूर्व नियोजन बैठकीत दिली. 
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3780&cat=Latestnews

महिला बचतगटाचा मेळावा

योजनांच्या अंमलबजावणीत बचत गटांचा सहभाग मिळावा- पालकमंत्री डी. पी. सावंत


नांदेड(अनिल मादसवार)शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत महिला बचत गटासारख्या संघटीत शक्तीचा मोठा सहभाग मिळाल्यास एक कल्याणकारी राज्य निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य आणि अपारंपारिक ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले आहे.हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे महिला बचतगटाच्या मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री डी. पी. सावंत बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. माधवराव पाटील जवळगावकर हे होते. 

विहंगम दृश्य

आभाळात गुलालाची उधळण
हिमायतनगर - तीन दिवसापासून जिल्ह्यात उन - सावल्यांचा खेळ सुरु असून, भाद्रपद कृ.९ दि.२८ शनिवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. पुन्हा उन सावल्यांच्या खेळणे सुर्य मावळतीला गेल्यानंतर आभाळात गुलालाची उधळण झाली. सायंकाळी ६.३५ मिनिटांनी या विहंगम दृश्याचे छायाचित्र टिपले आहे. छायाचित्रकार अनिल मादसवार यांनी

ग्रामसेवकाच्या बदलीवरून

हिमायतनगर येथील ग्रामसेवकाच्या बदलीवरून राजकारण सुरु...हिमायतनगर(वार्ताहर)येथील ग्रामपंचायत कार्यालय नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत येत असून, सध्या येथील ग्राम पंचायतीत कार्यरत ग्रामसेवकाच्या  बदलीवरून  सरपंच - उपसरपंच या दोघांमध्ये प्रतिष्ठेचे राजकारण सुरु झाले आहे. काहीजण हाच ग्रामसेवक पाहिजे तर काही जन हा नको या वाद -विवादामुळे येथील नागरी समस्यांची ऐशी तैशी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3775&cat=Himayatnagar

२७ सप्टेंबर, २०१३

निवडणूक प्रशिक्षण

सार्वत्रिक निवडणूकीसाठी अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे ... दिलीप स्वामी


नांदेड(अनिल मादसवार)सार्वत्रिक निवडणूक केंव्हाही घोषित होईल असे गृहीत धरुन जिल्ह्यातील निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व माहितीनिशी सज्ज रहावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बचत भवनात झालेल्या निवडणूक प्रशिक्षणाप्रसंगी आदेशित केले.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3758&cat=Nanded

अपघाताची शक्यता

लाखो रुपये खर्चून होणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या मध्यभागी विद्दुत खांबे... अपघाताची शक्यता बळावली


हिमायतनगर(वार्ताहर)परमेश्वर मंदिर ते कमानिपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाच्या काम सुरु झाले असून, सदरील रस्त्याच्या मधोमध विद्दुत पुरवठ्याचे खांब येत असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3753&cat=Latestnews

२६ सप्टेंबर, २०१३

मोर्चा व रस्ता रोकोचे आयोजन

पोलिस अत्याचाराच्या विरोधात लोकास्वराज्य आंदोलनाचा,०४ अक्टोबर रोजी धिक्कार मोर्चा व रस्ता रोको 

हिमायतनगर(वार्ताहर)मागील अनेक वर्षापासून सतत मातंग समाजावर अन्याय व अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दिवसा खून, बलात्कार, चोरीचा आळ घालून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र पोलिस व एल.सी.बी.दलाकडून होत आहेत. या मुळे सामान्य समाजातील नागरिकांना दडपणाखाली जीवन जगावे लागत आहे. मातंग समाजाला या दडपणापासून मुक्तता मिळून शासन दरबारच्या मुलभूत स्वतंत्र आरक्षणाच्या सुविधा मिळून घेण्यासाठी पोलिस अत्याचाराच्या विरोधात लोकास्वराज्य आंदोलना मार्फत ०४ अक्टोबर रोजी धिक्कार मोर्चा व रस्ता रोकोचे आयोजन करण्यात आले असून, ..........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3752&cat=Himayatnagar

चोरीचे सत्र

विद्युत रोहित्रामध्ये खाडोखोड करून लाखाच्या साहित्याची चोरी 
हिमायतनगर तालुक्यात डीपि चोरीचे सत्र सुरूच ....


हिमायतनगर(वार्ताहर)मागील वर्षभरापासून विद्युत पुरवठा सुरू असलेल्या रोहित्रामध्ये खाडोखोड करुन ओईल व महागड्या तांब्याची चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकाराकडे महावितरण कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. अशीच घटना २३ सप्टेंबरच्या रात्री घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

गुरुवार ठरला अपघातवार

ऑटो पालटून सरसम येथील एक तर औरंगाबादेतील घटनेत हिमायतनगरचा एक जन ठार...हिमायतनगर(प्रतिनिधी)अर्धवट काम ठेवलेल्या नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर ऑटो पलटी होऊन एक ठार, तीन गंभीर जखमी, तर ७ किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. २६ गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खडकी बा.वळण रस्त्यावर घडली आहे. तर औरंगाबाद येथील अपघातात हिमायतनगर येथील एक व्यापारी ठार झाला आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3728&cat=Latestnews

सैन्यभरती मेळावा

नांदेडला 19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सैन्यभरती मेळावानांदेड(प्रतिनिधी)राज्यातील औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार व परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुण युवकांसाठी नांदेड येथे सैन्य भरती होणार आहे. भरतीसाठी आवश्यक शारिरीक व शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या व सैन्यात स्वइच्छेने भरती होऊ पाहणाऱ्या युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सेना भरती कार्यालय औरंगाबादच्या संचालकांनी आवाहन केले आहे. .....http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3725&cat=Nanded

आवाहन

पदवीधर मतदारांनि ३० सप्टेंबर पूर्वी ओळखपत्राची प्रत द्यावी...गादेवाड


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील पदवीधर मतदार यादीत नाव समाविष्ठ आलेल्यांनी मतदार ओळखपत्राची प्रत येथील तहसील कार्यालयात असलेल्या निवडणूक शाखेत ३० सप्टेंबर पूर्वी द्यावी असे आवाहन तहसीलदार गादेवाड यांनी केले......
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3721&cat=Himayatnagar

२५ सप्टेंबर, २०१३

नवरात्र तयारी

गणेशोत्सवानंतर आता नवरात्र महोत्सवाचे वेध..जय्यत तयारी सुरु ...हिमायतनगर(अनिल मादसवार)गणेशोत्सवानंतर सर्वाना आता नवरात्र महोत्सवाचे वेध लागले असून, आदिमाता, दुर्गा, भवानी, कालीन्का, चंडीकाच्या स्वागताची जय्यत तयारी महिला मंडळ व युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी विशाल वाटर प्रुफ मंडप व डेकोरेशन तसेच ढोल ताश्याची बुकिंग व रंग रंगोटीच्या कामांना वेग आला आहे...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3704&cat=Himayatnagar

२४ सप्टेंबर, २०१३

स्वच्छतादूत

एस.टी. चालक बनला स्वच्छतादूत


नांदेड(अनिल मादसवार)स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हयात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  यात सर्वस्तरातील व्यक्तींचा समावेश करण्यात येत असून, नांदेड परिहवन मंडळाचे वाहन चालक व्यंकटराव सुगावे स्वच्छतादूत बनून गाडीत प्रवास करणारे प्रवासी व गावकर्‍यांचे प्रबोधन करत आहे. ...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3695&cat=Latestnews

पाटना एक्सप्रेसला थांबा दिल्याबद्दल जाहीर आभार


मागणी

दहावी - बारावी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची परीक्षा फीसची रक्कम तातडीने परत करा...मागणी

हिमायतनगर(वार्ताहर)येथील राजा भगीरथ शाळेत शिक्षण घेणाऱ्या दहावी व बारावीच्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेल्या परीक्षा फीसची रक्कम तातडीने परत करा या मागणीचे निवेदन येथील नसोसवायएफच्या विद्यार्थ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. .

२३ सप्टेंबर, २०१३

बळीराजाला

शासनाने बळीराजाला ताठ मानेने जगण्याची हिम्मत द्यायला हवी...सांगोळकर


दिघी(वार्ताहर)भारत देश कृषी प्रधान असून, जगाच्या पाठीवर देशाचे महत्व जगणेच मान्य केले आहे. आठरा धान्याच्या राशी पिकविणारा भारताचा बळीराजा कुणबी आज अतिवृष्टी व पुरपिडीच्या संकटात सापडला आहे. शासनाने बळीराजाला ताठ मानेने जगण्याची हिम्मत.....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3665&cat=Himayatnagar

गौण खनिजाची रात्री - अपरात्री चोरी

इतिहास कालीन अबाबकराच्या माळ पोखरणारे माफिया पुन्हा सक्रिय...
टेंभी येथील नागरिकांनी केली तहसीलदारांकडे कार्यवाहीची मागणी... 


हिमायतनगर(वार्ताहर)टेंभीच्या गायरान माळावरून गौण खनिजाची रात्री - अपरात्री चोरी होत असल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदार यांना गौण खनिज चोरीवर प्रतिबंध करून कार्यवाही करावी तसेच इतिहासकालीन अबाबकरच्या माळाचे अस्तित्व कायम ठेवावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. ..........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3658&cat=Mainnews

२२ सप्टेंबर, २०१३

सोयाबीन पिकाची क्षेत्रीय पाहणी

अतिवृष्टीने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याचा संशोधकांनी केला निर्वाळा,
परभणी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार श्री बेग यांनी केली पाहणी


हिमायतनगर(अनिल माद्सवार)अतिवृष्टीत झालेल्या पावसाने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. नांदेड न्युज लाइव्हने सतत दोन दिवसापासून वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीरतेने दखल घेऊन परभणी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार श्री बेग यांनी दि.२२ रोजी पळसपूर परिसरातील पिकाची पाहणी करून ७० टक्के नुकसान झाल्याचे मान्य केले असून, पावसाची स्थिती अशीच राहिल्या १०० टक्के पिके जातील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सदर पिकाचे नमुने संशोधनासाठी नेण्यात आले आहे. 

आभार

हिमायतनगर येथे पाटणा एक्स्प्रेसला थांबा ..
पत्रकार संघटनेकडून खा.सुभाष वानखेडे यांचे 
 आभार


हिमायतनगर(वार्ताहर)येथील तालुका पत्रकार संघटनेने वृत्तपत्राच्या माध्यमातून हिमायतनगर येथे पाटणा एक्सप्रेस गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन हिंगोली लोकसभेचे खा.सुभाष वानखेडे यांनि वरिष्ठ स्तरावर..........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3644&cat=Himayatnagar

२१ सप्टेंबर, २०१३

देयके प्रलंबित

विहीर पुनरभर्नाचे कुशल देयके प्रशासकीय अनास्थेमुळे प्रलंबित


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सन २०११ -१२ मध्ये करण्यात आलेल्या विहीर पुनरभर्नाचे कुशल कामाचे देयके वर्षभरापासून प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. यास संबंधित विभागाचे अधिकारी - कर्मचारी कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. 

सोयाबीनची प्रत्यक्ष पाहणी

अतिवृष्टीने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याचे वृत्त प्रकाशित होताच ...अधिकार्यांनी केली पाहणी... कृषी विद्यापीठाला कळविले


हिमायतनगर(प्रतिनिधी)पावसामुळे हातावर आलेल्या सोयाबीनच्या शेंगातील बियामधून अंकुर फुटू लागल्याचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हमधून प्रकाशित होताच कृषी विभागाने दखल घेऊन दि. २१ रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. तसेच परभणी कृषी विद्यापीठाला जा.क्र.ता.कृ.अ / नै.आ.१०/२१/ दि.२१ सप्टेंबर २०१३ च्या पत्राद्वारे काळउन सोयाबीन पिकाचे क्षेत्रीय पाहणी करण्यासाठी तातडीने शास्त्रज्ञांचे एक पथक पाठउन आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शन करावे असे पत्रात नमूद केले आहे. 

२० सप्टेंबर, २०१३

व्हिडिओ कॉन्फरन्स

मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स ‘जबाबदार आणि उत्तरदायी प्रशासना’चे प्रत्यंतर योजनांच्या अमलबजावणीत येईल

मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील प्रशासनाची देशभरातील प्रतिमा ‘जबाबदार आणि उत्तरदायी प्रशासन’ अशी आहे. टंचाई परिस्थिती आणि विदर्भातील पूरस्थितीचे  निवारण करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याचे प्रत्यंतर दिले आहे. असेच प्रत्यंतर आधार क्रमांक नोंदणी, अनुदानाचे थेट वाटप, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, अन्न सुरक्षा कायदा, सुकन्या व मनोधैर्य योजना यांच्या अंमलबजावणीमध्येही दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3605&cat=Marathwada

सोयाबिनवर संकट

पावसाच्या पाण्याने सोयाबिनच्या बियातून अंकुरे फुटली...बळीराजा दुहेरी संकटात


हिमायतनगर(अनिल मादसवार)अतिवृष्टीच्या पावसाने झालेल्या खरीपातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात आला आहे. उर्वरित पिकाच्या उत्पन्नातून तरी खर्च निघेल या आशेत असताना, सोयाबीनच्या शेंगातून चक्क अंकुरे बाहेर येत असल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. .....

१९ सप्टेंबर, २०१३

स्थलांतर

वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतराचा कालावधी निश्चित - पालकमंत्रीनांदेड(अनिल मादसवार)डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे विष्णुपुरी येथील नवीन इमारतीत स्थलांतर करण्यासाठी व त्यातील उर्वरीत बांधकामे पूर्ण करण्यासाठी 20 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी निश्चित केल्याची सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी मार्गदर्शन केले यावेळी खा. भास्करराव पाटील खतगावकर, प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रामुख्याने उपस्थित होते.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3588&cat=Latestnews

शेतकरी बेपत्ता

पुरात वाहून गेलेला सरसम येथील शेतकरी ४८ तासानंतरही बेपत्ता

हिमायतनगर(वार्ताहर)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी पुराच्या पाण्यात वाहून गेलेला शेतकरी ५० तास उलटूनही अद्याप बेपत्ता शेतकऱ्याच्या चिंतेने नातेवाईक आक्रोश करीत आहेत. दरम्यान तालुका दंडाधिकारी श्री एस.एम.गादेवाड, जी.प.सदस्य सुभाष राठोड यांनी बेपत्ता शेतकऱ्याच्या कुटुंबाना भेट देऊन तात्काळ तपास यंत्रणा कामाला लाऊन शोध लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी साईनाथ धोबे, दत्ता शिराने, नारायण सूर्यवंशी, मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल, तलाठी तेजस कुलकर्णी, शेख यांच्यासह गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. ...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3572&cat=Latestnews

दरवाजे उघडले

लिंबोटी धरणा च्या गेटवरून पाणी; सर्व दरवाजे उघडले; कर्मचारी गैरहजर, 'आरोग्य सभापती प्रविण पाटील यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला'लोहा(वार्ताहर)मन्याड नदीच्या परिसरात लातूर जिल्ह्यासह इतर भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे लिंबोटी चे अप्पर मन्याड धरण 'ओव्हर फ्लो' झाले. धरणाच्या गेटावरून पंधरा सेमी पाण्याचा 'फ्लो' वाहत होता त्यामुळे लिंबोटीसह इतर गावांना होणारा संभाव्य धोका जि.प. सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांच्या मुळे टळला. नदिपात्रात पाणी सोडण्यात आले, पण धरणावर कर्मचारी गैरहजर असल्यामुळे धोका निर्माण झाला होता. 

जयंती महोत्सव

चक्रधर स्वामी अवतार दिन व श्री गुरुगोविंद प्रभू जयंती महोत्सव २१ रोजी हिमायतनगर(वार्ताहर)नांदेड जिल्हा महानुभाव परिषद व हिमायतनगर तालुक्याच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन तथा अद्य समाज सुधारक श्री गुरुगोविंद प्रभू जयंती महोत्सवाचे आयोजन श्री दत्ताबापू हदगाव यांच्या शुभचिंतन मार्गदर्शनाने दि.२१ रोजी करण्यात आले असून, माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी.पी.सावंत, सौ.अमिताभाभी चव्हाण  यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न  होणार आहे. या कार्यक्रमास .........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3570&cat=Himayatnagar

१८ सप्टेंबर, २०१३

गुन्हा दाखल

पैसे मागणीच्या जाचास कंटाळून अंगणवाडी मदतनिसची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघींवर गुन्हा दाखल

हिमायतनगर(वार्ताहर)सुपरवायजर व कार्यकर्तीच्या जाचास कंटाळून तणनाशक विषारी द्रव्य प्राशन करून सिबदरा (ज.) येथील एका अंगणवाडी मदतनीसने आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी कार्यकर्तीला पोलिसांनी अटक केली असली तरी सुपरवायजर फरार आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3569&cat=Crime

बाप्पाला निरोप...

सुखकर्ता...दुखहर्त्या बाप्पाला भावपूर्ण निरोप....हिमायतनगर(अनिल मादसवार)अनंत चर्तुदशी बुधवारी दि.१८ रोजी दुपारी वाजत गाजत निघालेली श्री गणेशाची मिरवणूक गुरुवारी मध्यरात्री ०१ वाजता येथील श्री परमेश्वर मंदिरात पोहोंचली. तूच सुखकर्ता ... तूच दुखहर्ता... अवघ्या दिनाच्या नाता... बाप्पा मोरया रे... चरणी ठेवितो माथा... गणपती अपने गांव चाले... कैसे हमको चैन पडे... अश्या उत्साहपूर्ण वातावरणात मध्यरात्रीला २.५ वाजता सर्वात शेवटी नवप्रशांत गणेश मंडळाच्या युवकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3567&cat=Himayatnagar

'स्वरपुष्पांजली'

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन - गीत-संगीताच्या 'स्वरपुष्पांजली'ला नांदेडकरांचा भरभरुन प्रतिसाद

नांदेड(अनिल मादसवार)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वरपुष्पांजली' या गीत-संगीताच्या कार्यक्रमास रसिक नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 

वाहून गेला

सरसम येथील शेतकरी पुरात वाहून गेला...१८ तास उलटले तरी बेपत्ता ...

हिमायतनगर(वार्ताहर)मुसळधार पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात सरसम येथील एक ६० वर्षीय शेतकरी वाहून गेल्याची घटना दि.१७ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी घडली आहे. या घटनेला १८ तास उलटून गेल्यानंतर बेपत्ता असल्याने नातेवाईक व पोलिस शोध घेत आहे. 

आत्महत्या

सुपरवायजर व कार्यकर्तीच्या जाचास कंटाळून अंगणवाडी मदतनिसाची आत्महत्या

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सिबदरा(ज.)येथील एका अंगणवाडी मदतनीसाने अंगणवाडीच्या सुपरवायजर व कार्यकर्तीच्या जाचास कंटाळून तणनाशक विषारी द्रव्य प्राशन केले होते, दहा दिवसापासून मृत्यूशी झुंज देताना अखेर दि.१७ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने संतप्त झालेल्या गावकरी नागरिक व महिलांनी पोलिस स्थानकात प्रेत आणून ठिय्या मांडताच कार्यकर्तीला पोलिसांनी अटक केली असली तरी सुपरवायजर फरार ..........

विसर्जन

तालुका पत्रकार संघ व वरद विनायक गणेशाचे शांततेत विसर्जन


हिमायतनगर(वार्ताहर)गणपती बाप्पा मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या... जयघोषात पांडव कालीन वरद विनायक मंदिरातील व तालुका पत्रकार संघाने स्थापन केलेल्या श्री गणेशाचे विसर्जन शांततेत करण्यात आले.

कनकेश्वर तलावानजीकच्या गणपतीची पूजा आरती नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार यांच्या हस्ते करण्यात येउन बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3560&cat=Latestnews

१७ सप्टेंबर, २०१३

निवड

टेंभीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सरस्वताबाई सूर्यवंशीहिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील टेंभी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सरस्वताबाई सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्या आली. महिलेस संधी मिळाल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यामुळे येथील दारुड्या नवर्यावर अंकुश ठेवण्यासठी महिलांना आता पाठबळ मिळणार आहे......
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3551&cat=Himayatnagar

पावणे तीन लाखाची चोरी

दोन सराफा दुकानाचे शटर उचलुन, पावणे तीन लाखाचे दागीने व रोख रक्कम लंपास

देगलुर(वार्ताहर)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्व संध्या ते सकाळच्या वेळेत अज्ञात चोरट्याने सराफा दोन सराफा दुकानाचे शटर उचलुन, पावणे तीन लाखाचे दागीने व रोख रक्कमेची चोरी केल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवनेरी भागातून एक दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी वेगळा गुन्हा दाखल झाला आहे.........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3547&cat=Crime

लोकार्पण

अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण

नांदेड(प्रतिनिधी)दि नांदेड मर्चंट को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या सौजन्याने नांदेड वाघाळा महानगरपालिकेने वजिराबादच्या महात्मा गांधी पुतळा परिसरात उभारलेल्या हुतात्मा स्मारकाच्या (स्तंभ) नूतनीकरणाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) थाटात झाले. पालकमंत्री ना. डी. पी. सावंत, खासदार..............

वृक्षदिंडी

महापालिकेच्या वृक्षदिंडीला भरभरुन प्रतिसाद


नांदेड(प्रतिनिधी)महापालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला मंगळवारी (दि.17) भरभरुन प्रतिसाद मिळाला. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथून महापालिकेच्या विष्णुनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी हातात वृक्षांची रोपटे घेऊन दिंडी काढली. .....http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3536&cat=Latestnews

विसर्जन तयारी

'श्री' विसर्जनासाठी महापालिका सज्ज
सात ट्रॅक्टरच्या माध्यमातून यंदा निर्माल्य संकलन

चार क्रेन, 125 जीवरक्षक तैनात
लाकडी बॅरेकेटींग, प्रकाशाची अतिरिक्त सोय
सहा फ़ूटांवरील मूर्तींचे फ़क्त नावघाटावरच विसर्जन 


नांदेड(अनिल मादसवार)लाडक्या गणरायांना निरोप देण्यासाठी नांदेड महापालिकेची सर्व यंत्रणा तयारीनिशी सज्ज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिका, एमजीएम महाविद्यालय, युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक घाटावर निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली असून ......