NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

एड्स दिन

एड्स दिनानिमित्त भव्य रॅली

नांदेड(प्रतिनिधी)जागतिक एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयापासून नागरिकांनी सकाळी 8.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सायंकाळी झालेल्या अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त बैठकीत केले आहे. .......

अमोघ गांवकरांची बदली करा

आयपीएस अमोघ गांवकरांची बदली करा,अन्यथा जातीय दंगल घडेल
अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीची मागणी

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)बिलोली व धर्माबादचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर यांची बदली करावी,नसता जातीय दंगल घडेल,अशा आशयाचे निवेदन आज लोहगाव सर्कलच्या अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीने पोलिस अधीक्षक व्ही.एन.जाधव यांना दिले. ......

भूकंप होण्याची शक्यता नगण्य दक्षता आवश्यक - धीरजकुमार

शहरात 5 रिस्टर स्केलचा भूकंप होण्याची शक्यता नगण्य दक्षता आवश्यक - धीरजकुमार


नांदेड(अनिल मादसवार)शहरात 5 रिस्टर स्केल चा भूकंप होईल,अशी शक्यता नगण्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.त्यामुळे जनतेने घाबरू नये,असे आवाहन केले.22 व 28 नोव्हेंबर रोजी शहरात झालेल्या भूकंपाच्या आवाजावर आज प्रशासनाच्यावतीने पत्रकार परिषदेत खुलासा करण्यात आला.याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.निशिकांत देशपांडे,तांत्रिक व्यक्ती डॉ.पी.आर.वेसणेकर,प्रा.श्रीनिवास ओंधकर, महानगरपालिकेचे उपायुक्त कंधारे यांची उपस्थिती होती. ..........

कडूलिंबाच्या झाडातून गोड दुधाची धार..

निसर्गाची किमया ..
कडूलिंबाच्या झाडातून गोड पाण्याची(दुधाची)धार..बघ्यांची गर्दी

हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे एकंबा गावातील एका शेतकऱ्याच्या अंगणातील कडूलिंबाच्या झाडातून चक्क गोड पाण्याची (दुधाळ रंगाची)धार पडू लागली आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असून, हा प्रकार मागील चार दिवसापासून सुरु आहे. जो तो नागरिक या प्रकाराबाबत कुतूहलाने चर्चा करीत तर्क - वितर्क काढीत आहेत. ..........

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

ग्रामसेवकाला 10 हजाराचा रोख दंड

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला 10 हजाराचा रोख दंड
महिला सरपंचास शिवी देणे भोवले..!

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)एका वर्षापूर्वी कोरम अभावी सभा तहकुब करणाऱ्या किनवट तालुक्यातील हिरापुर कोठारी येथील महिला सरपंचास जाती वाचक व अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या ग्रामसेवकास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व 10 हजाराचा दंड तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी. म्हस्के यांनी शुक्रवारी सुनावली. ........

जनजागृतीवर महापालिकेचा भर

शहरातील दोन्ही भूकंपमापक यंत्रे सुरु आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृतीवर महापालिकेचा भर

नांदेड(अनिल मादसवार)शहरात बसवण्यात आलेली दोन्ही भूकंपमापक यंत्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत असून गेल्या आठवड्याभरात दोन विविध दिवशी झालेल्या भूकंपाची नोंद या यंत्रात झालेली आहे. तथापि त्याची तीव्रता 1 रिक्टर स्केलपेक्षा कमी स्वरुपाची असून अशा धक्क्यांमुळे कोणतीही हानी होण्याची शक्यता नाही. नागरिकांनी कोणत्याही अफ़वांवर विश्वास ठेऊ नये; परंतु नेहमी सावध राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ........

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

हल्लाबोल मोर्चा व निषेध रेलीने शहर दणाणले

बौद्ध मूर्ती विटंबना प्रकरणी हिमायतनगर बंद शांततेत.. हल्लाबोल मोर्चा व निषेध रेलीने शहर दणाणले 

हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भातील उमरखेड तालुक्यातील कुरळी(नारळी) येथील बौद्ध मूर्तीची विटंबना करून अज्ञात समाज कंटकानी करून समाजबांधवांच्या भावना दुखविल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्त शुक्रवारी हिमायतनगर बाजारपेठ बंद, हल्लाबोल मोर्चा व निषेध रेलीने शहर दणाणून काढले. सदर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येवून मोर्चाचा समारोप करण्यात आले. या बंद व निषेध रेलीस शहरातील व्यापारी, नागरिक व समाज बांधव महिला - पुरुषांनी ओठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी पार पडला. .........

संभाजी ब्रिगेड वर्सेस काँग्रेसचे शीतयुद्ध सुरु...

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष देवसरकर यांची गाडी फोडली , संभाजी ब्रिगेड वर्सेस काँग्रेसचे शीतयुद्ध सुरु...

नांदेड(अनिल मादसवार)मराठा आरक्षणासाठी बुधवारी संध्याकाळी अज्ञात लोकांनी आ.माधवराव जवळगावकर यांची गाडी फोडल्या नंतर त्यांना प्रत्त्युत्तर म्हणून आमदारांच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांची एम.एच. २६ व्ही ३१३१ या कारवर दगडफेक करून तोडफोड केली असून, यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड वर्सेस काँग्रेसचे शीतयुद्ध सुरु झाल्याचे बोलले जात आहे. ..........

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

काँग्रेस आमदारची गाडी फोडली

मराठा आरक्षणासाठी हदगाव - हिमायतनगर काँग्रेस आमदारची गाडी फोडली

नांदेड(अनिल मादसवार)मराठा समाजास इतर मागास वर्गीय प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे हि मागणी लोकसभा निवडणुकी पूर्वी मान्य करा.. नाहीतर खुर्च्या खाली करा.. अश्या घोषणा देत हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हनुमानगड कमानीजवळील घरासमोर उभी असलेली इनोव्हा एम.एच.२६- ए.के.०७०७ या गाडीवर संतप्त जमावाने दगडफेक करून तोडफोड करून मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरील आंदोलन तीव्र करून आमदार खासदार यांना त्यांच्याच जिल्ह्यात व तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचे समजते. .......

एड्स नियंत्रण दिनएड्स नियंत्रण दिनानिमित्त 01 

डिसेंबरला भव्य रॅलीचे आयोजन


नांदेड(अनिल मादसवार)येत्या 1 डिसेंबर रोजी मानवी साखळीेने जागतिक एड्स नियंत्रण दिन गेटींग टू झिरो या घोषवाक्याने भव्य रॅली काढून साजरा करण्यात येणार असून 1 ते 7 डिसेंबर पर्यंत एड्स जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी धीरजकुमार हे होते. ..........

अपंग दिन

जागतिक अपंग दिनानिमित्त साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील अपंगांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास सर्व अपंग सामावेशितानी उपस्थित राहावे असे आव्हान, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविर्चंद श्रीश्रीमाळ, सचिन जाधव, ज्ञानेश्वर आहेरकर, राजेश्वर चीटमलवार साईनाथ गाजलेकर आदींनी केले आहे. ........

योगशिबिरांचे आयोजन

नांदेडमध्ये प्रथमच २४ ठिकाणी योगशिबिरांचे आयोजन साधकांना लाभ घेण्याचे, पतंजली योग समितीचे आवाहन


नांदेड(अनिल मादसवार)भारत स्वाभिमान ट्रस्ट आणि पतंजली योग समिती नांदेड यांच्या संयुक्तविद्यमाने स्व.राजीव दीक्षित यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नांदेड शहरात व जिल्ह्यात दि.३० नोव्हेबर ते ५ डिसेंबर २०१३ या दरम्यान योगमहोत्सव संपन्न होत आहे .
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4877&cat=Mainnews

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१३

मुरूम - दगडाची चोरी...

सिरंजणी  - शेलोडा रस्त्यासाठी ८८ ब्रास मुरूम व १०८ ब्रास दगडाची चोरी...
माफिया व गुत्तेदारावर साढेसहा लाखाचा दंडाचा पंचनामा... 
अधिकारी धडकताच पाच ट्रक्टर व एक जेसीबीसह वाहनधार पसार  


हिमायतनगर(अनिल मादसवार)विना परवाना चोरीच्या मार्गाने शासकीय संपत्तीचे उत्खनन करून रस्त्याची मजबुतीच्या कामात वापर केला जात असलेल्या माफियाच्या कामावर अधिकारी पोहोचतच ट्रक्टर व एक जेसीबीसह वाहनधार पसार झाल्याची घटना दि.२५ सोमवारी शेलोडा - सिरंजणी रस्त्यावर घडली आहे. यावेळी मंडळ अधिकारी यांनी रस्त्यावर अनधिकृत रित्या टाकण्यात आलेल्या ८८ मुरुमाच्या व १०८ दगडाच्या ढिगार्याचा पंचनामा करून जवळपास साढेसहा लाखाचा दंडाचा पंचनामा करून तसा अहवाल तहसील कार्यालयाकडे सोपविला आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य गौण खनिज माफियात खळबळ उडाली आहे.  ......http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4849&cat=Himayatnagar

पूर्व नियोजनाची बैठक

माळेगाव यात्रेच्या पूर्व नियोजनाची बैठक बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न नांदेड(अनिल मादसवार)येत्या 31 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पूर्व नियोजनाची बैठक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, अर्थ व आरोग्य सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4854&cat=Latestnews

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

हरवला

बोलता न येणारा व्यक्ती हरवला

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सरसम येथील गल्लीत फिरून परत येणारा मुका(बोलता न येणारा) ४५ वर्षीय व्यक्ती हरवल्याची घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी घडली. तेंव्हापासून तो परत आला नसल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र अद्याप तो बेपत्ता आहे. कुणास सापडल्यास खालील पत्यावर संपर्क साधून माहिती द्यावी, त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. ...

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

भूकंप

शहराला भूकंपाचा अतिशय सौम्य धक्का; नागरिकांनी काळजी घ्यावी,पण घाबरु नये महापालिकेचे आवाहन

नांदेड(अनिल मादसवार)शहराला शुक्रवारी (दि.22) रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता अतिशय कमी आणि काळजी करण्यासारखी नाही. त्याकरिता नागरिकांनी नेहमी सावध राहावे; परंतु घाबरुन जाऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पूर्वानुभव लक्षात घेता शहरात मागील काही वर्षापासून हिवाळ्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे भूकंपाच्या धक्क्याला घाबरुन न जाता घरातील सुरक्षित टेबल, खुर्ची, कॉट, बीमखाली आश्रय घ्यावा, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. ............

राष्ट्रीय लोकअदालत

राष्ट्रीय लोकअदालत म्हणजे प्रकरणे मिटविण्याचा महायज्ञ - प्रमुख जिल्हा न्यायाधीश द. ऊ. मुल्ला


नांदेड(अनिल मादसवार)आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञ या धार्मिक विधीला अत्यंत महत्व असून, आजची राष्ट्रीय लोकअदालत म्हणजे महायज्ञ असून पक्षकारांनी आपला तिरस्कार व द्वेष भावना या महायज्ञात भस्म करुन जास्तीत जास्त प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत,असे प्रतिपादन नांदेड जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. द. ऊ. मुल्ला यांनी केले. .........

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३

काम रखडले

टाकराळा  - मानसिंग तांडा रस्त्याचे काम रखडले 
हिमायतनगर(वार्ताहर)बांधकाम खात्याकडून उपलब्ध झालेल्या निधीतून प्रत्यक्षात कोणतेही काम न करताच मटेरियल खरेदीच्या नावाखाली बांधकाम अभियंता यंत्रणेच्या माध्यमातून गुत्तेदाराने लाखो रुपयाची उचल करून रक्कम हडप करण्याच्या प्रयत्न चालविला आहे. या प्रकाराकडे संबंधितानी लक्ष देवून अपहर करू पाहणार्यावर कार्यवाही करावी अशी मागणी विकास प्रेमी नागरीकातून केली जात आहे...........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4815&cat=Himayatnagar

कृषी पंपधारक वैतागले

महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला ..कृषी पंपधारक वैतागले

हिमायतनगर(अनिल मादसवार)रब्बी हंगामाची सुरुवात होताच महावितरण कंपनीने मनमानी कारभार सुरु केला असून, सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे कृषीपंपधारक शेतकरी वैतागले आहे. ....

मागणी

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी

हिमायतनगर(वार्ताहर)भारतीय राज्यघटनेने बालकांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अधिकार दिलेले आहेत. यात जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा, व सहभागाचा आदी अधिकार मिळावेत या साठी यु.एन.ने जी आचार संहिता तयार केली. ती आचार संहिता भारत देशाने मान्य करून स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार बालकांना..........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4817&cat=Latestnews

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

चातुर्मास

शिवनागनाथ मंदिरात चातुर्मास उत्सवाचे आयोजन

हिमायतनगर(वार्ताहर)येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या शिवनागनाथ मंदिराच्या संयोजकांच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी चातुर्मास उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्तिक कृष्ण पंचमी शके १९३५ दि.२२ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या उत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होवून शोभा वाढवावी असे आव्हान मोहन सातव, सदशिव सातव, अध्यक्ष सुदर्शन पाटील यांनी केले आहे. .........

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

राजस्व अभियान

सुवर्ण जयंती राजस्व अभियानचा लाभ सर्वांनी घ्यावा .. गादेवाड

हिमायतनगर(वार्ताहर)महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल विभाग व अन्य विभागाच्या संयुक्तपणे सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरु करण्यात आले असून, या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून लाभ घेवू अभियान यशस्वी करावे असे आव्हान तहसीलदार एस.एम. गादेवाड यांनी केले. .........

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

स्व. इंदिरा गांधी यांची जयंती

आय. काँग्रेसच्या माणसाना आईचा विसर.../

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यात आय काँग्रेस नावावर जगणारे खंडीचे पंधरा कार्यकर्ते असताना एकही पदाधिकार्यांनी काँग्रेस पक्षाच्या आईची म्हणजे स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात स्वारस्य दाखविले नसल्याने काँग्रेस च्या माणसाना आईचा विसर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. .......

कलावंत दाखल

हिमायतनगरात अवतरले प्रभू श्रीराम 


हिमायतनगर शहरात कार्तिक पौर्णिमेचा पर्वकाळात आंध्रप्रदेश - कर्नाटक बोर्डर वरील कलावंत दाखल झाले असून, प्रभू श्री रामाचे रूप साकारून गावातील नागरिक, दुकानदार यांचे मनोरंजन करीत भक्ती गीताने आकर्षित करीत आहेत. त्यांच्या आगमनाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. छाया - अनिल मादसवार ..http://www.nandednewslive.com/photogallery.php

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

भागवत

भागवताचे लिखाण मानव जातीच्या कल्याणासाठी...बबन शास्त्री चिपळूणकर

हिमायतनगर(अनिल मादसवार)सध्याच्या काळात मनुष्य मंडभाग्याची, तसेच वंशदोष, कुलदोष, पितृदोष, कालसर्प, आचार विचार रहित आहेत. सदर बाबीसा आधुनिक सत्पुरुष मार्गदर्शन करण्यास सक्षम नाहीत. ज्ञानोबा, तुकोबाची भाषा लोकांना काळात नाही, अश्या वेळेस आमचे आचार, विचार, उच्चार, व्यवहार,आहार, प्रायश्चित्त, हर्म, या संबंधित श्रीमद भागवत ग्रंथ हा एक आदर्श मार्गदर्शनपर गुरु या रुपात हा ग्रंत होय. म्हणूनच भगवान श्री वेदव्यास यांनी श्रीमद भागवत हा ग्रंथ मानव जातीच्या काल्यानास्ठी लिहिला आहे. असे उद्गार मुंबई येथील ह.ब.प.बबन शास्त्री चिपळूणकर यांनी काढले ते, हिमायतनगर येथील बजरंग चौकातील भोरे यांच्या निवास स्थानी आयोजित भागवत प्रवचन दरम्यान उपस्थितांना उदोबोधीत करीत होते. .........

कार्तिक स्वामी दर्शन समर्पण

बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी.. १७ रोजी दर्शनाचा योग

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील बालाजी मंदिरात असलेल्या भगवान श्री कार्तिक स्वामी (षडानंद) दर्शन समापन दिनानिमित्त मंदिर संचालकाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, या वर्षी दि.१७ कार्तिक पोर्णिमा कृतिका नक्षत्र दिनी तीन योग एकत्र आल्यामुळे या दिनी सपत्निक कार्तिक स्वामी दर्शन घेत येईल अशी माहिती वेद शास्त्रीय संपन्न पुरोहित कांतागुरु वाळके यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली. ..............

कठाळ्याचे दुखद निधन..

परमेश्वर मंदिर कठाळ्याचे दुखद निधन..
पशुवैद्यकीय अधिकार्याचा हलगर्जीपणा कारणीभूत

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील श्री परमेश्वर मंदिरास शिवसेनेचे कार्यकर्ते रामभाऊ ठाकरे यांनी अर्पण केलेला कठाळ्या (नंदीबैल) याचे आज सकाळी कोणतेतरी विषारी प्राणी अथवा औषध प्राशन केले. त्याचा असर मस्तकावर चढताच कठाळ्याने बसस्थानक परिसरातीत हाथ गाडे व काही दुकानात शिरून धुमाकूळ माजवून नासधूस केली. याच धुंदीत कठाळ्या मुर्चीत होवून परमेश्वर मंदिर परिसरात जमिनीवर पडला. जवळपास अर्धा तास तडफड करून अखेर कठाळ्याने प्राण सोडले. कठाळ्याचे अश्या प्रकारे अकाली निधन झाल्याने शेतकरी, नागरिक व नंदीबैल प्रेमींनी हळहळ व्यक्त केले आहे.

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

शेतकऱ्यांना 29 कोटी 59 लक्ष अर्थसहाय्य

अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना 29 कोटी 59 लक्ष अर्थसहाय्याचे वाटप - जिल्हाधिकारी यांचे आदेश

नांदेड(अनिल मादसवार)जिल्ह्यात खरीप हंगामात जुन व जुलै 2013 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे बाधीत झालेल्या किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्यातील एकूण 1 लाख 21 हजार 427 शेतकऱ्याना 29 कोटी 59 लक्ष 31 हजार रुपयाची नुकसान भरपाई वाटपासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी तहसिलदारांना वितरीत केल्याचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. ............

गटविकास अधिकार्याची उद्धटपणाची वागणूक

अपहार प्रकरणी कार्यवाहीसाठी उपोषणाचा चौथा दिवस... उपोषणकर्त्यासोबत गटविकास अधिकार्याची उद्धटपणाची वागणूक

हिमायतनगर(अनिल मादसवार)समाजमंदिर व तंटा मुक्त भवनाचे बांधकाम न करताच विद्यमान सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाणे पावणे पाच लाखाचा अपहार केल्याचा अहवाल देणारे खुद्द गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे यांनी स्वार्थासाठी अपहार कर्त्यांना अभय दिले आहे. सदरचे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने तिसर्या दिवशी उपोषण स्थळी भेट देवून उपोषण सोडा असे म्हणून दिशाभूल करणारे पत्र दिले. माघार घेण्यास नकार देणाऱ्या उपोषण कार्त्यांसोबत उद्धट पणाची वागणूक दिल्याने भ्रष्ठाचार करणार्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप उपोषण कर्त्यानी पत्रकारांशी बोलताना करून वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे........

तुलसी विवाह प्रारंभ

कडाक्याच्या थंडीत मिळतेय भक्तीची उब 
काकडा दिंडीच्या उपस्थितीत तुलसी विवाह प्रारंभहिमायतनगर(वार्ताहर)कार्तिक मास व दीपावली पर्वाच्या काळात सुरु झालेल्या काकडा दिंडीत वारकरी संप्रदाईक महिला - पुरुष भक्तांची गर्दी वाढली असून, कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील दिंडीत सामील होत असलेल्या भक्तांना भक्तीची उब मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे...........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4710&cat=Latestnews

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

लाच घेतांना पोलीस निरीक्षक अटक

११ हजाराची लाच घेतांना पोलीस निरीक्षक जमादाराला पकडले

नांदेड(अनिल मादसवार)अपघात गुन्ह्याची नोंद न करण्यासाठी मुंबईच्या एका व्यक्तीकडून ११ हजार रुपयांची लाच घेतांना हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजा मुंजाजी टेहरे व त्याच ठाण्यातील पोलीस जमादार लक्ष्मीकांत धोंडोपंत कुलकर्णी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने बुधवारी (दि. १३) दुपारी ४.३० वाजता रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला त्याच ठाण्यात रंगेहाथ पकडल्याची आणि त्याच ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात लाच घेतल्याशिवाय कामेच होत नाहीत. ही घटना आजच्या प्रकाराने स्पष्ट झाली आहे.

याबाबतची हकीकत अशी की, अजयकुमार किशनदेव फेकी रा. कंबोली पनवेल हे हदगावच्या पोलीस ठाण्यात आले. मागे झालेल्या अपघात गुन्ह्याची नोंद न करण्यासाठी त्यांनी पोलीस निरीक्षक टेहरे यांना विनंती केली. परंतु पैसे घेतल्याशिवाय कोणाची कामेच करायची नाहीत असा हदगाव ठाण्याचा शिरस्ता राहिला आहे. परंतु पोलीसांनी मागितलेली रक्कम देण्यास फेकी हे असमर्थ होते. त्यांनी लगेचच नांदेडला स्नेहनगर भागात असलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विरोधी कार्यालयात लेखी तक्रार दिली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक पठाण, पोलीस निरीक्षक राहीरे यांच्या नेतृत्वाखाली एक सापळा रचण्यात आला. आणि या सापळ्यात पोलीस निरीक्षक टेहरे, त्यांचे विश्‍वासू सहकारी कुलकर्णी आपोआपच जाळ्यात सापडले. रोख ११ हजाराची रक्कम घेतांना दोघेही पकडले गेले. ऍन्टी करप्शनच्या जाळ्यात आडकल्यानंतर दोघांचीही पाचावर धारण उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दररोज प्रेसनोट काढण्यात येते. हदगावच्या ठाण्यात महत्वाची घटना घडलेली असतांना जनसंपर्क कार्यालयाला त्याची माहिती नव्हती. थांबा, पाहतो, बघतो म्हणून वेळ मारून नेण्यात आली. पत्रकारांनी हदगावच्या पोलीस ठाण्यास फोन केला असता अजून गुन्हा दाखल झालेला नाही, घटना खरी आहे असे जुजबी उत्तर ठाणे अमलदारांनी दिले. लाईट गेली आहे, नंतर फोन लावा असे सांगून फोन आदळून ठेवण्यात ठाणे अंमलदाराने धन्यता मानली. ठाण्याचा प्रमुखच ऍन्टी करप्शनच्या जाळ्यात सापडल्यामुळे ठाणे अंमलदार ठाण्याची अब्रू उघड पडली आहे. जिल्हा पोलीस  अधीक्षक कार्यालयात सुद्धा फोन केला असता फोन कोणी उचलला नाही. हदगावच्या आजच्या घडनेचे पडसाद सर्वच पोलीस ठाण्यापर्यंत बिनतारी यंत्रणेद्वारे गेले असावेत, पोलीस निरीक्षक टेहरे हे यापूर्वी नांदेड, माहूरला सुद्धा  कार्यरत होते. सध्या ते हदगावला कार्यरत असून त्यांचा कारभार किती  वादग्रस्त आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

आमरण उपोषण

शासनाचा निधी हडप करू पाहणाऱ्यावर कार्यवाहीसाठी तंटामुक्त समिती अध्यक्षासह गावकर्यांचे आमरण उपोषण

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील कार्ला पी.गट ग्राम पंचायातीस उपलब्ध झालेल्या लाखोच्या निधीतून समाजमंदिर व तंटा मुक्त भवनाचे बांधकाम न करताच विद्यमान सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी पावणे पाच लाखाचा अपहार केल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड झाले होते. यास सहा महिन्याचा कालावधी लोटला असताना कार्यवाही गुलदस्त्यात ठेवून वरिष्ठ अधिकारी अपहार कर्त्यांना अभय देत ..........

फरार आरोपीस पुणे येथून अटक

पाच महिन्यापासून फरार आरोपीस पुणे येथून अटक ... पंजाबनगर पती - पत्नी जळीत कांड प्रकरण

हिमायतनगर(अनिल मादसवार)हदगाव रस्त्यावरील पंजाबनगर येथिल दाम्पत्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून पेट्रोल टाकून दि.04 जून 2013 च्या मध्यरात्री जाळून मारले होते. त्यातील मुख्य सूत्रधार मागील वर्षभरापासून फरार झाला होता. त्यास पोलिसाच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले असून, हिमायतनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. ..

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

पत्रकार एकवटले

पत्रकार मारहाण प्रकरणी सर्व पत्रकार एकवटले
आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचे पोलीस महानिरीक्षकांचे आश्‍वासन

नांदेड(प्रतिनिधी)हदगावचे पत्रकार शिवाजी देशमुख,माजी नगरसेवक शेख कलीम शेख चांद व वरूण देशमुख या तिघांना मारहाण करणार्‍या आरोपीविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे पत्रकारांनी पोलीसांवर विश्‍वास ठेवावा असे आश्‍वासन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांनी आज सोमवारी (दि.११) जिल्ह्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले...........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4671&cat=Latestnews

रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

शिवाजी देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत निषेध

देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध

हिमायतनगर पत्रकार संघाकडून निषेध 

हदगाव येथील नांदेड न्युज लाइव्ह्चे पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यासह तिघांजणावर काही समाजकंटकांनी शनिवारी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समजताच हिमायतनगर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने माझी अध्यक्ष कानबा पोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील उत्कर्ष फोटो गैलरी येथे बैठक घेण्यात येवून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच अश्या सराईत गुन्हेगार हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करून अश्या घटनांना आवर घालावा अशी मागणी करण्यात अली आहे. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जांबुवंत मिराशे, अशोक अनगुलवार, अनिल भोरे, अनिल मादसवार, दत्ता शिराने, परमेश्वर शिंदे, प्रेमकुमार धर्माधिकारी, सुभाष गुंडेकर, साईनाथ धोबे, फाहद खान, असद मौलाना, सचिन माने, धम्मपाल मुनेश्वर, नागोराव शिंदे, चांदराव वानखेडे, अ.गन्नि, गंगाधर पडवळे, आनंद मोरे, सर्व पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते आकाश ढोणे, केदार ताटेवाड, निरंजन मिराशे, रवि आलेवाड, श्रीनिवास बोम्पिलवार, बजरंग टेंभीकर, शिवप्रसाद सागर यांच्यासह अनेक पत्रकार, छायाचित्रकार व वृत्त पत्र विक्रेते उपस्थिती होती...........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4666&cat=Latestnews

नांदेड(प्रतिनिधी)हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत हदगाव तालुका संघातर्फे निषेध करण्यात आला. 

राजकीय बातमी दिल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर शनिवारी चौघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता, परंतु देशमुख यांनी चाकूचा वार चुकविला आणि बालंबाल बचावले.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

लाखोचे नुकसान ...

अचानक लागलेल्या आगीत शेतकर्याचे घर जळून लाखोचे नुकसान ...


हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी शहरातील एका शेतकऱ्याच्या  घराला आग लागून शेती, अवजारे व घृह उपयोई साहित्य जळून लाखोचे नुकसान झाले आहे. सदरची घटना शहरातील कन्या शाळेच्या पाठीमागील वस्तीत दि.०६ च्या मध्यरात्री ०१ वाजेच्या दरम्यान घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून शेतकऱ्यांसह घरातील चौघांना सुखरूप बाहेर काढण्यास यश आले, अन्यथा मोठी हानी झाली असती. वृत्त लिहीपर्यंत आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4624&cat=Himayatnagar

रेतीच्या वाहनावर कार्यवाही

हिमायतनगर येथे रेतीच्या वाहनावर दुसर्यांदा कार्यवाही ... राजकीय पुढार्यांचे रेतीमाफियाना अभय हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात अविद्या रित्या रेतीची तस्करी पुन्हा जोमात सुरु झाली असून, एकाच आठवड्यात दुसर्यांदा रेतीची तस्करी करणारा टिप्पर महसूल विभागाच्या मंडळ अधिकार्यांनी पकडल्याने गुण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. परंतु माफियांना अभय देणाऱ्या राजकीय नेत्यामुळे शासन नियमानुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गोची होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4628&cat=Latestnews

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

पोलीस कोठडी

पोलिसांना गुंगारा देवून पळून गेलेल्या आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)दिवाळीच्या पहिल्या दिवशी, धनत्रयोदशीला विमानतळ पोलिसांना गुंगारा देवून पळून गेलेल्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरतवाड यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे...........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4619&cat=Latestnews

उपर्‍यांचा सन्मान

मुळ मालकांना डावलुन उपर्‍यांचा सन्मान
हुजपा कारखान्याच्या विक्री नंतर भाऊरावकडुन ऊस उत्पादकाचा गाळपा वेळी विसर...

हदगाव(शिवाजी देशमुख)हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना लि. हडसणी हा भाऊराव सहकारी साखर कारखान्याने विकत घेतल्या नंतर त्याचे पहीले गाळप दि. 06 नोव्हेंबर बुधवार रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या गाळपाचा गाजावाजा मोठया प्रमाणात करण्यात आला असला तरी कारखान्याचे मुळ भाग (शेअर्स) विकत घेणारे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना या गाळपास निमंत्रीत न केल्याने भाऊराव कारखान्याच्या मनमानी पध्दतीविरुध्द हदगांव तालुक्यात तीव्र संतापाचा लाट पसरली असुन या कारखान्याच्या माध्यमातुन गेलेली शक्ती प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्थानिक आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या स्वप्नावरही पाणी फिरले आहे. .......

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

शुभारंभ बुधवारी

भाऊरावने खरेदी केलेल्या हुजपा कारखान्याचा सन २०१३ -१४ चा गाळप शुभारंभ बुधवारी

हिमायतनगर/हदगाव(वार्ताहर)भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या युनिट क्र.४ हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना हदगावच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ बुधवार दि.०६ रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास तमाम शेतकरी, उस उत्पादक, ........

लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी

भोकर येथील एस.बी.आय बँक लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी

भोकर(मनोज चव्हाण)दिवाळीचा आनंद साजरा करताना होत असलेल्या फटाक्याच्या आवाजाचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी येथील भारतीय स्टेट बैंक लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.०३ च्या रात्री घडली आहे.

भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडीया या बँकेत, मागच्या दारातून प्रवेश करुन दोन अनोळखी चोरटयांनी कटरने तिजोरी कापण्याचा...

दैव बलवत्तर

मुलीस भेटण्यासाठी जाणारा व्यक्ती सहस्रकुंडात....दैव बलवत्तर वाचले प्राण


इस्लापूर(गणेश जयस्वाल)मराठवाड्यातून पैनगंगा नदी पार करून विदर्भातील मुलीस भेटण्यासाठी जात असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा तोल जाऊन सहस्रकुंड ...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4613&cat=Nanded

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

दिवाळी

जिल्हाभरात दिवाळीचा सन फटक्याच्या अतिशबाजीत साजरा

नांदेड(अनिल मादसवार)जिल्हाभरात अश्विन अमावस्या दि.०३ रविवारी ठरलेल्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करण्यात येवून दिवाळीचा सन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वच व्यापारी, शेतकरी, व ....http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4605&cat=Mainnews

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

आभाळभर शुभेच्छा..


सर्व मित्र परिवार व बंधू - भगिनींना दिवाळीच्या पावन पर्वनिमित्ताने आभाळभर शुभेच्छा..
शुभेच्छुक - अनिल मादसवार व परिवार  .......

दिवाळी

दिवाळीत फटाके उडवताना पुरेशी काळजी घ्या - महापौर व आयुक्तांचे आवाहन

[Updated at : 02-11-2013 ]
नांदेड(अनिल मादसवार)दिवाळीनिमित्त शहरातील सर्व जनतेला शुभेच्छा देताना महापौर अब्दुल सत्तार व मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी फटाके उडवताना पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती गणपत धबाले, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, महिला .........

कार्यवाही करा.

दलित वस्तींच्या नावावर इतर वस्त्यांचा विकास करणार्यावर कार्यवाही करा..मागणी

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरात करण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतर वस्त्यात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असून, एक प्रकारे दलितांवर अन्यायच केला जात असल्याने निधी वापर करणार्या यंत्रणेवर अनुसिचीत जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दलित समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. ....